आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिलीप कुमार यांचे पेशावर येथील वडिलोपार्जित घर पूर्णपणे कोसळले, प्रतिकृती बनवणार -पाक

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दिलीप कुमार यांचे पेशावर येथील वडिलोपार्जित घर पूर्णपणे कोसळले आहे. - Divya Marathi
दिलीप कुमार यांचे पेशावर येथील वडिलोपार्जित घर पूर्णपणे कोसळले आहे.
पेशावर - ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांचे पाकिस्तानच्या पेशावर येथील वडिलोपार्जित घर शेवटी पाक प्रशासनाच्या दुर्लक्षाचे बळी ठरले आहे. 2014 मध्ये पाकिस्तानने या घराला राष्ट्रीय संपदा घोषित केले होते. तरीही कित्येक दशकांपासून धूळ खात असलेल्या घराची वाताहात सुरूच होती. अखेर गुरुवारी हे घर पूर्णपणे कोसळले आहे. दिलीप कुमार यांच्या अर्धांगिणी सायरा बानू हे वृत्त ऐकूण उद्विग्न झाल्या आहेत. 

खैबर प्रशासनाला दोष
मोहल्ला खुदा दाद येथील ऐतिहासिक किस्सा खवानी बाजारात असलेल्या या घराला पाकिस्तानने 2014 मध्ये नॅशनल हेरिटेजचा दर्जा दिली. गेल्या काही वर्षांपासून पाक सरकार या घराला संग्रहालयात बदलणार अशी चर्चा सुद्धा उडाली होती. मात्र, खैबर पख्तूनख्वाच्या प्रादेशिक सरकारने त्यावर दुर्लक्ष केल्याची टीका होत आहे. पाकिस्तान सरकारने या जागेवर त्याच घराची प्रतिकृती उभारणार असे जाहीर केले आहे.
 
पाकिस्तानच्या सांस्कृतिक वारसा परिषदेचे सरचिटणीस शकील वहीदुद्दीन म्हणाले, या परिस्थितीला केवळ खैबर प्रशासन जबाबदार आहे. या ऐतिहासिक वारसाचे संगोपन करण्याच्या मागणीसह प्रशासनाला त्यांनी 6 वेळा अधिकृत पत्र पाठवले. तरीही प्रशासनाने त्यावर दुर्लक्ष केले. दरम्यान, हे घर पूर्णपणे कोसळल्याचे वृत्त वहीदुद्दीन यांनी सायरा बानू यांना दिले. त्यावेळी त्या अतिशय भावूक झाल्या. 

केवळ सामाजिक कार्यकर्तेच नव्हे, तर पाकिस्तानच्या अनेक पत्रकारांनी सुद्धा या घराच्या देखरेखसाठी प्रशासनाला वेळोवेळी विनवणी केली. त्याचा खैबर प्रशासनावर काहीच परिणाम झाला नाही. कित्येक वर्षांपासून या घराचे मुख्य गेट आणि दरवाजे पूर्णपणे तुटून झिजले होते. 
 
या अॅक्टर घराण्याचेही पाकमध्ये घर
केवळ दिलीप कुमारच नव्हे, तर कपूर घराणे, शाहरुख खान, आणि दिवंगत अभिनेते विनोद खन्ना यांचीही पेशावर येथे वडिलोपार्जित घरे आहेत. मोहल्ला दादच्या याच घरात 1922 मध्ये युसूफ खान यांचा जन्म झाला. पुढे जाऊन युसूफ बॉलिवुडचे स्टार दिलीप कुमार म्हणून ओळखले गेले. केवळ भारतच नव्हे, तर पाकिस्ताननेही त्यांना आपल्या देशातील सर्वोच्च नागरी सन्मान देऊन 1998 मध्ये गौरव केला.