Home »News» Dilip Kumar And Saira Banu Celebrate 51st Anniversary With Family & Friends

दिलीप-सायरा यांनी सेलिब्रेट केला लग्नाचा 51वा वाढदिवस, या कारणामुळे झाले नाही मुलबाळ

दिव्य मराठी वेब टीम | Oct 12, 2017, 16:01 PM IST

  • सायरा बानो आणि दिलीप साहेबांनी साजरा केला लग्नाचा 51 वा वाढदिवस. डावीकडे- त्यांच्या लग्नातील छायाचित्र

मुंबईः बॉलिवूडचे ट्रॅजेडी किंग म्हणून प्रसिद्ध असलेले अभिनेते दिलीप कुमार आणि त्यांच्या पत्नी सायरा बानो यांनी बुधवारी म्हणजे 11 ऑक्टोबर रोजी लग्नाचा 51वा वाढदिवस साजरा केला. यानिमित्ताने त्यांच्या मुंबईतील 48 पाली हिलस्थित राहत्या घरी फॅमिली मेंबर्स आणि निकटवर्तीयांसाठी एका छोट्या गेट टू गेदरचे आयोजन करण्यात आले होते.

सायरा बानो यांनी शेअर केले Photos...
- लग्नाच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनचे फोटोज सायरा बानो यांनी दिलीप कुमार यांच्या ट्वीटर अकाउंटवर शेअर केले आहेत.
- सोशल मीडियावर चाहत्यांनी दिलीप साहेब आणि सायरा यांना शुभेच्छा दिल्या. सायरा यांनीही त्यांच्या फॉलोअर्सचे आभार व्यक्त केले.
- सायरा बानो यांनी लिहिले, "आमच्या लग्नाच्या 51व्या वाढदिवशी मी आमचा मित्रपरिवार आणि कुटुंबातील सदस्यांसह लाखो चाहत्यांच्या प्रार्थना आणि प्रेमासाठी आभार व्यक्त करते."
1966 मध्ये केला होता सायराबरोबर विवाह
- दिलीप कुमार आणि सायरा बानो यांचे लग्न 11 ऑक्टोबर 1966 ला झाले होते. सायरा दिलीप यांच्यापेक्षा 22 वर्षांनी लहान आहेत.
- सायरा बानो वयाच्या 8 व्या वर्षापासून दिलीप कुमार यांच्याशी लग्नाचे स्वप्न पाहत होत्या.
- 1952 मध्ये रिलीज झालेला 'दाग' चित्रपट पाहिल्यानंतर त्या त्यांच्यावर फिदा झाल्या होत्या.
यामुळे पिता बनू शकले नाहीत दिलीप कुमार..
- दिलीप कुमार आणि सायरा बानो यांना मूलबाळ नाही, हे सर्वांनाच माहिती आहे. पण फार कमी लोकांना त्यामागचे कारण माहिती आहे. दिलीप कुमार यांनी त्यांचे आत्मचरित्र 'द सबस्टान्स अँड द शॅडो' मध्ये याबाबत लिहिले आहे.
- पुस्तकात दिलीप कुमार यांनी म्हटल्यानुसार, 1972 मध्ये सायरा प्रेग्नंट होत्या. त्यावेळी त्यांच्या गर्भात मुलगा होता.
- 8 महिन्यांच्या गर्भवती असलेल्या सायरा यांना रक्तदाबाचा त्रास झाला होता. त्यावेळी गर्भाची वाढ जवळपास पूर्ण झाली होती. पण बाळाला वाचवण्यासाठी सर्जरी करणे शक्य नव्हते. त्यामुळे
श्वास कोंडून बाळाचा मृत्यू झाला. या घटनेनंतर सायरा बानो कधीही आई होऊ शकल्या नाहीत.
दिलीप साहेबांनी केले होते दुसरे लग्न...
- सायरा बानो यांच्याशी विवाहानंतर 16 वर्षांनी त्यांनी पाकिस्तानच्या आसमा रेहमान यांच्याशी दुसऱ्यांदा निकाह केला होता. सायरा बानो आई होऊ शकत नाही, म्हणून त्यांनी दुसरे लग्न केले अशी चर्चा त्यावेळी होती.
- आसमा आणि दिलीप कुमार यांचे नाते फार काळ टिकले नाही.
- आसमा आणि दिलीप कुमार यांची भेट हैदराबादेत एका क्रिकेट मॅचदरम्यान झाली होती.
- 1980 मध्ये त्या दोघांनी लग्न केले आणि 1982 मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. आसमा धोका देत असल्याने दिलीप कुमार यांनी तिला तलाक दिला आणि पुन्हा सायरा बानो यांच्याकडे परतले, असे म्हटले जाते.
पुढील स्लाईड्सवर बघा, दिलीप कुमार आणि सायरा बानो यांचे निवडक PHOTOS...

Next Article

Recommended