आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिलीप कुमार यांचा पद्म विभूषणने गौरव, गृहमंत्र्यांनी घरी जाऊन केला सन्‍मान

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - भारतीय सिनेसृष्टीतील दिग्गज अभिनेते दिलीप कुमार यांना रविवारी पद्म विभूषण पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी आज दिलीप कुमार यांच्‍या घरी जाऊन त्‍यांचा पुरस्‍काराने सन्‍मान केला. या प्रसंगी दिलीप कुमार यांच्‍या पत्‍नी पत्नी सायरा बानो भावूक झाल्‍या होत्‍या.
25 जानेवारीला झाली होती घोषणा
पद्म विभूषण पुरस्‍कारासाठी दिलीप कुमार आणि अमिताभ बच्चन यांच्‍या नावांची घोषणा शासनाने केली होती. त्‍यानंतर एप्रिल महिन्‍यात राष्‍ट्रपती भवनात पुरस्कार वितरण सोहळा साजरा झाला. या सोहळ्यात दिलीप कुमार उपस्‍थित राहू शकले नाहीत. त्‍यामुळे शासनाने त्‍यांच्‍या घरी जाऊन सन्‍मान करण्‍याचा निर्णय घेतला होता.
कित्‍येक चित्रपटांमध्‍ये महत्‍त्‍वपूर्ण योगदान
93 वर्षीय दिलीप कुमार यांच्‍या 'मुग़ल-ए-आज़म’, 'नया दौर’, 'देवदास’, 'मधुमति’, 'गंगा-जमुना’, 'आजाद’, 'लीडर’ आणि 'मशाल’ यांसारखे कित्‍येक चित्रपट आजही लोकप्रिय आहेत. रसिकांच्‍या काळजात घर करणा-या या दिग्‍गज अभिनेत्‍याला 1991 मध्‍ये पद्म भूषण आणि 1994 मध्‍ये दादा साहेब फाळके पुरस्काराने गौरवण्‍यात आले.
पुढील स्‍लाइड्सवर क्‍लिक करून पाहा, पुरस्‍कार वितरणाचे फोटो, शेवटच्‍या स्‍लाइडवर VIDEO..