आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिलीपकुमार हॉस्पिटलमध्ये दाखल; प्रकृती बरी असल्याचे केले ट्विट, चाहत्यांना धन्यवाद

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - प्रसिद्ध अभिनेते दिलीपकुमार यांची प्रकृती खालवल्यामुळे त्यांना मंगळवारी येथील लीलावती हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. दिलीपकुमार यांना ताप आणि पायांवर सूज आली आहे. त्यांची पत्नी प्रसिद्ध अभिनेत्री सायरा बानो यांनी सांगितले, दिलीप साहेबांच्या पायावर थोडी सूज होती, त्यामुळे मंगळवारी रात्री त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. आता त्यांची प्रकृती बरी आहे. रुटिन चेकअप केले जात आहे. 11 डिसेंबर रोजी दिलीपकुमार 94 वर्षांचे होत आहेत.
ट्विट करुन दिली प्रकृतीची माहिती...
- दिलीपकुमार यांनी ट्विट करुन आपल्या चाहत्यांना प्रकृती सुधारत असल्याची महिती दिली.
- ट्विट मध्ये म्हटले, की सर्व चाहत्यांनी प्रकृती स्वास्थ्यासाठी दुआ केल्या, त्यांना धन्यवाद.
राजनाथसिंहांनी घरी जाऊ दिले पद्मविभूषण
- दिलीपकुमार यांना 2015 मध्ये पद्मविभूषण या नागरी सन्मानाने सन्मानित करण्यात आले होते.
- केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांनी दिलीपकुमार यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांना पद्मविभूषणने सन्मानित केले होते.
- यावेळी सायरा बानो, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते.
पुढील स्लाइडमध्ये पाहा, दिलीपकुमारांचे लेट्स्ट फोटोज्...
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...