आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Health update: दिलीप कुमार अजुनही आयसीयुमध्ये पण प्रकृती स्थिर - लीलावती हॉस्पिटल

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - अभिनेता दिलीप कुमार यांना हॉस्पिटलमध्ये दाखल होऊन आज सहा दिवस झाले आहेत. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, दिलीप कुमार यांच्या प्रकृतीत आता फार सुधारणा होत आहे. सध्या आयसीयुमध्ये असले तरी त्यांची प्रकृती आता स्थिर आहे. किडनीच्या क्रिएटीनीन लेव्हलची माहिती गुप्त असते त्यामुळे ती सांगण्याची परवानगी नाही पण आता त्याची लेव्हल कमी झाली आहे आणि त्यामुळे त्यांची प्रकृतीही सुधारत आहे असे डॉक्टरांनी सांगितले. 
 
अजून एक अथवा दोन दिवस त्यांना गरजेनुसार आयसीयुमध्ये ठेवणार असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. त्यांच्या वयाचा विचार करता त्यांना खास उपचार देता यावे यासाठी त्यांना आयसीयुमध्ये ठेवण्यात आले आहे असे समजते. 
 
 रुग्णालयात दाखल झाल्यानंतर पाचव्या दिवशी अशी होती दिलीप कुमारांची प्रकृती..
 
अभिनेता दिलीप कुमार यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती नुकतीच लीलावती हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी पाचव्या दिवशी दिली होती. दिलीप यांच्या तब्येतीत हळूहळू सुधारणा होत आहे आणि लवकरच ते नॉर्मल होतील अशी माहिती डॉक्टरांनी दिली.
 
 पुढच्या स्लाईडवर वाचा, डिहायड्रेशनच्या समस्येमुळे रुग्णालयात दाखल झाले होते दिलीप कुमार..
 
बातम्या आणखी आहेत...