आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिलीप कुमार यांना हॉस्पीटलमधून डिस्चार्ज, पत्नी सायरा बानोने दिला खास संदेश

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - अभिनेते दिलीप कुमार यांना लीलावती हॉस्पीटलमधून डिस्चार्ज देण्यात आला आहे. डिहायड्रेशनने त्रस्त असलेल्या दिलीप कुमार यांना गेल्या आठवड्यात हॉस्पीटलमध्ये दाखल करण्यात आले होते. आता त्यांची प्रकृती पूर्णपणे स्थिर झाली असून डॉक्टरांनी त्यांना घरी जाण्यास परवानगी दिली. 
 
सायरा बानो यांनी दिला खास संदेश..
सायरा बानो यांनी म्हटले की, "अल्लाहच्या कृपेने दिलीप साहेबांवर डॉ. नितीन गोखले, डॉ. अरुण शाह, फॅमिली फिजीशिअन डॉ. अरुण शाह आणि डॉ. अरुण गोखले यांनी दिवसरात्र केलेल्या मेहनतीने दिलीप साहेब सुखरुप आहेत. या सर्वांनी संमती दिल्यानंतर आज दिलीप साहेबांना घरी घेऊन जात आहोत. यावेळी त्यांच्या सर्व चाहत्यांचे, शुभचिंतकांचे, हॉस्पीटलमध्ये दिलीप साहेबांची काळजी घेतलेल्या स्टाफचे मी मनापासून आभार मानते."
 
पुढच्या स्लाईडवर वाचा, काही दिवसांपूर्वी डिहायड्रेशनच्या समस्येमुळे होते त्रस्त.. 
बातम्या आणखी आहेत...