मुंबई- शाहरुख खान आणि काजोल ही सुपरहिट जोडी रोहित शेट्टीच्या 'दिलवाले' या आगामी सिनेमात झळकणार आहे. या सिनेमाचे शूटिंग सध्या डेड-सी (मृत समुद्र)वरती सुरु आहे. याचा एक फोटो एसआरकेने आपल्या टि्वटरवर शेअर केला आहे. फोटोला बारकाईने पाहिले तर दिसते, की शाहरुख-काजोल स्टारर 'दिलवाले दुल्हनिया ले जाएंये'ची आठवणे येते.
सूर्यास्ताच्या सौंदर्याच्या बॅकग्राऊंडमध्ये घेतलेला हा फोटो एका सिलआऊटसारखा दिसत आहे. हा फोटो पाहून स्पष्ट दिसते, की शाहरुख आणि काजोलच्या रोमँटिक केमिस्ट्रीची जादू पुन्हा एकदा चालणार. या फोटोविषयी शाहरुखने टि्वट करून लिहिले, 'Got myself a hat & Kajol a malmal (cloth) to thank Rohit & Team for an awesome shoot & checked if the magic continues'
शाहरुख-काजोल स्टारर या सिनेमाचे शूटिंग मागील दिवसांत बुल्गारियामध्ये सुरु होते. सिनेमामध्ये वरुण धवन आणि किर्ती सेननसुध्दा मुख्य भूमिकेत आहेत.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा 'दिलवाले'च्या सेटवर शाहरुख आणि काजोलचे काही फोटो...