आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

केंद्रीय मंत्री सुप्रियो म्हणाले- MNS गुंडांचा पक्ष, \'ऐ दिल\'साठी गृहमंत्र्यांचे आश्वासन

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली -  \'ऐ दिल है मुश्किल\'च्या प्रदर्शनाचा मार्ग \'मुश्किल\' होत चालला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी पाकिस्तानी कलाकारांचा सहभाग असलेला हा चित्रपट प्रदर्शित होऊ देणार नाही, अशी भूमिका घेतली आहे. त्यावर केंद्रीय मंत्री बाबुल सुप्रियो यांनी, मनसे हा गुंडांचा पक्ष असल्याची टीका केली. दरम्यान \'ऐ दिल\'चे दिग्दर्शक करण जोहर आणि चित्रपट दिग्दर्शक मुकेश भट्ट यांनी केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांची आज भेट घेतली. 
या भेटीनंतर मीडियासोबत बोलतानी, भट्ट म्हणाले, की \'ऐ दिल है मुश्किल\'च्या प्रदर्शनावेळी संरक्षण देण्याचे आश्वासन केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांनी दिले आहे
 
 गृहमंत्र्यांनी कोणते आश्वासन दिले..
-  देशातील सर्व मुख्यमंत्र्यांना चित्रपटाला संरक्षण पुरवण्याचे निर्देश दिले जातील, असे गृहमंत्री म्हणाले.
- केंद्रीय गृहमंत्र्यांच्या या निर्देशाचे पालन करायचे असेल तर राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांना चित्रपट प्रदर्शनापूर्वी ताब्यात घेण्याचे आदेश पोलिसांना द्यावे लागतील, असे सूत्रांनी म्हटले आहे. 
 
गुरुवारी करण, मुकेश भट्ट यांच्यासह केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांच्या नॉर्थब्लॉक येथील कार्यालयात त्यांची भेट घेणार आहे. मल्टिप्लेक्समधील कर्मचाऱ्यांनी या चित्रपटाला विरोध करत काम बंद आंदोलन करण्याचे जाहीर केले आहे. कर्मचाऱ्यांना संघटनेचा पाठिंबा असून कामावरुन कमी केले तर मल्टिप्लेक्स मालकांविरोधात आंदोलनाचीही तयारी कर्मचाऱ्यांनी ठेवली आहे.
 
मनसेचा विरोध 
पाकिस्तानी कलाकार फवाद खानची भूमिका असल्याने मनसेने या चित्रपटाला विरोध दर्शवला आहे. बुधवारी मनसे कार्यकर्ते मेट्रो चित्रपटगृहाबाहेर एकत्र आले. या वेळी त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. मनसे चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर म्हणाले, आम्ही काही दिवसांपूर्वीच करण जोहर आणि चित्रपटगृह मालकांना चित्रपट प्रदर्शित न करण्याच्या सूचना दिल्या आहेत. मात्र, त्यानंतरही चित्रपट प्रदर्शित झाल्यास त्याला मनसे स्टाइलने उत्तर देण्यात येईल, असे ते म्हणाले.
 
मल्टिप्लेक्समधील कामगारांचा विरोध
मल्टिप्लेक्समध्ये काम करणाऱ्या कामगारांनीही या चित्रपटाला विरोध दर्शवला आहे. पीव्हीआर, सिनेपोलिस, कार्निव्हलसह इतर चित्रपटगृहांत 70 टक्के कर्मचारी मनसे कामगार संघटनेचे आहेत. मल्टिप्लेक्समधील तंत्रज्ञ, सुरक्षा रक्षक व चतुर्थश्रेणी कर्मचारीही मनसेशी बांधील आहेत. त्यामुळे या संघटनेने संप पुकारला तर चित्रपटगृह मालकांना चित्रपट चालवणे अवघड हाेऊ शकते.
बातम्या आणखी आहेत...