आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Director Kunal Deshmukh Shared His Memories Related To Nepal Earthquake

नेपाळ भूकंपातून सुखरुप परतले \'जन्नत\' फेम दिग्दर्शक कुणाल देशमुख, ऐकवली आपबिती

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फाइल फोटोः कुणाल देशमुख)
दिल्ली: नेपाळमध्ये आलेल्या भूकंपानंतर दिग्दर्शक कुणाल देशमुख बेपत्ता झाल्याची बातमी आली होती. मात्र सात तासानंतर महेश भट, इमरान हाश्मी आणि मोहित सुरी यांनी कुणाल देशमुख सुखरूप असल्याचे मीडियाला सांगितले. आता कुणालसुद्धा नेपाळहून भारतात परतले आहेत. त्यांनी मुंबईत आल्यानंतर नेपाळ मधील आपबिती सांगितली, कुणाल आपल्या एका मित्राच्या लग्नात सहभागी होण्यासाठी नेपाळमध्ये गेले होते. दोन दिवस तेथे भूकंपाने हाहाकार माजवला आहे. यावेळी कुणालचा मेसेज आला की, ते काठमांडूपासून दहा किलोमीटर अंतरावर असलेल्या गोरखाना फॉरेस्ट रिसॉर्टमध्ये वरातीसोबत थांबले आहेत.
तेव्हापासून इमरान हाश्मी आणि मोहित सुरी सतत त्यांच्या संपर्कात होते. सात तासांसाठी येथील वीज बंद करण्यात आली होती. त्यामुळे त्यांच्याशी संपर्क साधता येत नव्हता. जसा वीजपुरवठा पुर्ववत झाला, तशी कुणाल यांनी नेपाळहून इमरान आणि मोहितला सुखरुप असल्याचे कळवले. ज्या हॉटेलमध्ये कुणाल थांबले होते, भूकंपाच्या झटक्यानंतर ते रिकामे करण्यात आले आणि सर्व पाहुण्यांना जवळील 18 गोल्ड कोर्समध्ये थांबवण्यात आले.
रविवारी सकाळी कुणाल काठमांडू विमानतळावर पोहोचले आणि दुपारी 2.20 च्या फ्लाइट पकडू या विचारात ते होते. मात्र सततच्या भूकंपाच्या झटक्याने फ्लाइट लँड करण्याची परवानगी नव्हती. याचदरम्यान कुणाल रॉयल एअरफोर्स विमानसाठी सामान्य लोकांच्या रांगेत उभे झाले. हे विमान लोकांना दिल्लीत घेऊन जाणारे होते. दुर्दैवाने हे विमानही रद्द करण्यात आले.
अखेर प्रतिक्षा संपली आणि संध्याकाळी 5.15 मिनिटांचे विमान पकडून रात्री दहाच्या सुमारास ते दिल्लीत दाखल झाले.
या सिनेमांचे केले दिग्दर्शन
>>जन्नत (2008, लीड स्टार कास्ट : इमरान हाश्मी, सोनल चौहान)
>>तुम मिले (2009, लीड स्टार कास्ट : इमरान हाश्मी, सोहा अली खान)
>>जन्नत 2 (2012, लीड स्टार कास्ट : इमरान हाश्मी, ईशा गुप्ता)
>>राजा नटवरलाल (2014, लीड स्टार कास्ट : इमरान हाश्मी, हुमैमा मलिक)