आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'जाने भी दो यारो' चे दिग्दर्शक कुंदन शहा यांचे हार्टअटॅकने निधन, राष्ट्रपतींनी व्यक्त केले दुःख

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - 'जाने भी दो यारो', 'कभी हा कभी ना' असे एकापेक्षा एक सुंदर चित्रपट आणि 'नुक्कड' सारख्या मालिकांचे दिग्दर्शक करणारे कुंदन शहा यांचे मुंबईत निधन झाले. 69 व्या वर्षी मुंबईत राहत्या घरी शनिवारी रात्री हार्ट अटॅक आल्याने त्यांचे निधन झाले. पुण्यातील फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टीट्यूटमधून त्यांनी दिग्दर्शनाचे धडे गिरवले होते. 

कुंदन शहा यांनी 983 मध्ये दिग्दर्शनात पाऊल ठेवले. त्यांचा पहिलाच चित्रपट होता जाने भी दो यारो. बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाचा फारसे यश मिळाले नाही. पण शहा यांना या पहिल्याच चित्रपटासाठी राष्ट्रीय पुरस्कार आणि पहिल्याच उत्कृष्ट सिनेमासाठी दिला जाणारा इंदिरा गांधी पुरस्कार देण्यात आला. त्यांचा हा चित्रपट भारतीय चित्रपट सृष्टीतील सर्वाधिक गाजलेल्या ब्लॅक कॉमेडी चित्रपटांच्या यादीत आघाडीवर आहे. 

कुंदन शहा यांनी 1986 मध्ये नुक्कड या मालिकेद्वारे टीव्ही इंडस्ट्रीत पदार्पण केले. त्यानंतर त्यांनी वागले की दुनिया या आर के लक्ष्मण यांच्या कार्टूनवर आधारित मालिकेचे दिग्दर्शन केले. 1993 मध्ये शाहरूख खानच्या 'कभी हा कभी ना' चित्रपटाद्वारे त्यांनी सिनेसृष्टीत कमबॅक केले. त्यानंतर 'क्या कहना', 'दिल है तुम्हाला' असे चित्रपटही त्यांनी केला. त्यांचा अखेरचा चित्रपट होता, 'पी से पीएम तक'. त्यांच्या निधनावर बॉलिवूडमधील त्यांच्या मित्रांनी दुःख व्यक्त केले आहे. 

पुढील स्लाइड्सवर पाहा, कुंदन शहा यांच्या निधनावर बॉलिवूड सेलिब्रिटींच्या प्रतिक्रिया...
बातम्या आणखी आहेत...