आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

AIB Roast प्रकरणी निर्माता-दिग्दर्शक करण जोहरला मुंबई पोलिसांचे समन्स

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबईः गेल्या वर्षी झालेल्या 'एआयबी नॉकआऊट' या वादग्रस्त कार्यक्रमाप्रकरणी ताडदेव पोलिसांनी कारवाई करण्यास सुरुवात केली असून निर्माता-दिग्दर्शक करण जोहरला समन्स बजावण्यात आले आहे. या कार्यक्रमादरम्यान अश्लील कॉमेंट्स तसेच हावभाव केल्याचा आरोप करणवर लावण्यात आला असून पोलिसांनी त्याला चौकशीसाठी बोलावले आहे.
गेल्या वर्षी वरळीतील एनएससीआयमध्ये एआयबी नॉकआऊट हा कार्यक्रम झाला. या कार्यक्रमात अश्लिल हावभाव, अश्लिल कृत्य केल्याचा आरोप आहे. शिवाय हा कार्यक्रम करण्यासाठी सेन्सॉरची परवानगी घेतली नसल्याचाही आयजोकांवर ठपका ठेवण्यात आला आहे.
मुंबईच्या गिरगाव कोर्टाने या कार्यक्रमात सहभागी झालेल्या एकुण १४ लोकांविरोधात एफआयआर दाखल करण्याचे आदेश गेल्यावर्षी दिले होते. एआयबी नॉकआऊटमध्ये करण जोहरसह अभिनेता रणवीर सिंह, अर्जुन कपूर यांच्यासह बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रेटी उपस्थित होते. सहभागी प्रेक्षकांवर अश्लिल टिपण्णी करणे असाही आरोप यांच्यावर आहे.
बातम्या आणखी आहेत...