आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिशाला नशिबाचा दुसऱ्यांदा धोका! 'स्टुडंट ऑफ इयर2'मध्ये दिशाऐवजी सारा अली खान

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
टाइगर श्रॉफबरोबर स्क्रीन शेअर करण्याचे दिशा पटानीचे स्वप्न पुन्हा एकदा तुटण्याच्या स्थितीत आहे. सूत्रांच्या माहितीनुसार 'स्टुडंट ऑफ इयर-2'मध्ये आता दिशाऐवजी टाइगरसोबत सैफ अली खानची मुलगी सारा दिसण्याची शक्यता आहे. टायगर श्रॉफची कथित गर्लफ्रेंड दिशा पटानी हिने करण जोहरचा 'स्टुडंट ऑफ इयर-2' साइन केल्याच्या गेल्या काही दिवसांपासून चर्चा होत्या. टायगर या चित्रपटात मुख्य भूमिकेत असून एप्रिलपासून त्याची शूटिंग सुरू होणार होती. आता दिशाऐवजी या चित्रपटात सैफची मुलगी सारा अली खान काम करणार असल्याच्या बातम्या येऊ लागल्या आहेत. या चित्रपटात ती मुख्य अभिनेत्रीच्या भूमिकेत असेल. 

सूत्रांच्या माहितीनुसार या चित्रपटात टायगरच्या मध्यस्थीमुळेच दिशाला संधी देण्यात आली होती. प्रोड्यूसर करण जोहर आणि दिग्दर्शक पुनीतचेही दिशाबाबत एकमत झाले होते. आता मात्र अचानक साराचे नाव पुढे येऊ लागले आहे. याबाबत अद्याप कुणी अधिकृत माहिती दिली नसली तरी, साराचे नाव फिक्स समजले जात असून, साराने तशी तयारीही सुरू केली आहे. 

'स्टुडंट ऑफ इयर-2'मधून दिशा आणि टायगर या ऑफ स्क्रीन लव्ह बर्डसला पहिल्यांदाच एकत्र येण्याची संधी मिळाली होती, मात्र आता ती संधी गेल्याचे दिसत आहे. सारा स्टार किड्स असल्याने दिशापेक्षा तिचे पारडे जड असल्याचे काहींचे म्हणणे आहे. तसे पाहिले तर करण जोहर आपल्या चित्रपटाची गोपनियता कायम ठेवत असल्याचा यापूर्वीचा अनुभव असल्याने 'स्टुडंट..'बद्दल तो काहीतरी बदल करील हे नक्की होते, झालेही तसेच! मुळात स्वत:च्या चित्रपटाची अनाउंसमेंट स्वत: करणे करणला आवडते. 'स्टुडंट..'साठी इतरांच्या तोंडून यापूर्वीच दिशाचे नाव घेतले जाऊ लागल्याने तो कदाचित नाराज होता. 

साराची आई अमृता सिंग आणि टायगर श्रॉफचे वडील जॉकी श्रॉफ यांनी यापूर्वी चार चित्रपटात एकत्र काम केले आहे. आता या दोघांचे स्टार किड्स प्रथमच एकत्र स्क्रीन शेअर करणार आहेत. टायगरने आपल्या भूमिकेची तयारीही सुरू केली आहे. 

दुसरीकडे साराच्या डेब्यूबाबत सैफ अली खानने मात्र अद्याप काहीच वक्तव्य केलेले नाही. तैमूरच्या जन्मानंतर करिनाबरोबरच तो व्यग्र दिसला. अमृताने आपल्या मुलीच्या डेब्यूची चांगलीच तयारी केली असून यापूर्वी अमृताने सारासाठी अनेक चित्रपट नाकारले होते. सारापेक्षा तिची आईच प्रदार्पणाबाबत जास्त सजग दिसली. आता करणने संधी दिली आहे. 

टायगरबरोबर काम करण्याची संधी हातातून जाण्याचा प्रकार दिशाबरोबर दुसऱ्यांदा घडला. यापूर्वीही असा प्रकार घडला आहे. साजीद नाडियाडवाला याच्या 'बागी'मध्ये टायगर आणि दिशाचे नाव फायनल समजले जात होते. या दोघांनीही आपापल्या भूमिकांची तयारी सुरू केली होती. शूटिंग सुरू होण्यापूर्वी अचानक दिशाऐवजी श्रद्धा कपूरला रिप्लेस करण्यात आले. आता 'स्टूडंट्स ऑफ इयर-2'मध्येही याच प्रकाराची पुनरावृत्ती झाली. टायगर आणि दिशामध्ये प्रेमप्रकरण सुरू असले तरी, एकत्र काम करण्यासाठी दिशाला नशिब साथ देत नसल्याचे दिसते. 
 
पुढील स्लाईड्समध्ये बघा, दिशाला पछाडत 'स्टूडंट्स ऑफ इयर-2'मध्ये वर्णी लावणा-या सारा अली खानचे खास फोटोज...
 
बातम्या आणखी आहेत...