आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'ढिशूम\'ने बॉक्स ऑफिसवर केली धमाल, जाणून घ्या आतापर्यंतची कमाई

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई: जॉन अब्राहम, वरुण धवन, जॅकलिन फर्नांडीस आणि नर्गिस फाखरी स्टारर \'ढिशूम\' सिनेमाने रिलीजच्या पहिल्याच आठवड्यात 37.32 कोटींचा बिझनेस केला आहे. रोहित धवन दिग्दर्शित या सिनेमाने 29 जुलैला रिलीज झालेल्या दिवशीच 11.05 कोटींचा गल्ला जमवला. निर्मात्यांनी दिलेल्या वक्तव्यानुसार, आठवडाभरात प्रेक्षकांनी थिएटरमध्ये गर्दी केली. शनिवारी सिनेमाची कमाई 12.02 कोटी रुपये होती. तसेच रविवारी 14.25 कोटींचा गल्ला जमवला. 
 
नाडियाडवाला ग्रँडसन एंटरटेन्मेंटच्या बॅनरखाली साजिद नाडियाडवाला निर्मित \'ढिशूम\' सिनेमा एका भारतीय फलंदाजाच्या भोवती गुंफलेला आहे. तो भारत-पाकिस्तानमध्ये होणा-या सामन्यादरम्यान अचानक गायब होतो. अरब देशाचे पोलिस संयुक्त रुपात त्याला शोधण्यासाठी 36 तासांचे ऑपरेशन चालवतात. जॉन आणि वरुण सिनेमात मुख्य भूमिकेत असून अक्षय खन्ना दिर्घकाळानंतर नकारात्मक भूमिकेत दिसला आहे. 
 
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा सिनेमाचे काही स्टिल्स, प्रमोशनचे Photos...
बातम्या आणखी आहेत...