आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिलवाले\'च्या वाईट परफॉर्मन्सने रोहित शेट्टी-शाहरुख खानच्या मैत्रीत बिघाडी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रोहित शेट्टी आणि शाहरुख खान (फाइल फोटो) - Divya Marathi
रोहित शेट्टी आणि शाहरुख खान (फाइल फोटो)
मुंबई- बॉक्स ऑफिसवर 'दिलवाले'च्या वाईट परफॉर्मन्सनंतर रोहित शेट्टी आणि शाहरुख खान यांच्यात वाद सुरु झाला आहे. दोघांच्या टीमने सिनेमाच्या अपयशाचे खापर एकमेकांच्या माथ्यावर फोडण्यास सुरुवात केली आहे.
शाहरुखने केले कमी प्रमोशन- रोहित शेट्टी
रोहित शेट्टीच्या टीमने शाहरुखची कंपनी रेड चिलीजला म्हटले, की शाहरुख खानने या सिनेमाचे प्रमोशन हवे तसे केले नाही. तो जितके इतर सिनेमांचे प्रमोशन करतो, तितके या सिनेमाचे केले नाही. शिवाय मार्केंटिंगसुध्दा योग्य पध्दतीने केले नाही. त्यामुळेच सिनेमा फ्लॉप झाला.
काय आहे वादाचे कारण?
'दिलवाले' 18 डिसेंबरला रिलीज झाला. आतापर्यंत भारतातील बॉक्स ऑफिसवर यांच्या कमाईचा आकडा 150 कोटीसुध्दा झाला नाहीये. जवळपास 100 कोटींच्या बजेटमध्ये बनलेल्या या सिनेमामुळे वितरकांना नुकसान सहन करावे लागले. विशेष म्हणजे, रोहित शेट्टीसोबत असे पहिल्यांदा झाले आहे.
कुणाला किती तोटा झाला?
सूत्रांच्या सांगण्यानुसार, 'दिल्ली-पंजाब'च्या वितरकांनी 40 कोटींत सिनेमा शाहरुखच्या कंपनीकडून खरेदी केला. त्यांचे नुकसान 35 टक्के झाले आहे. राजस्थानमध्ये 8.25 कोटींमध्ये विकला. नुकसान 40 टक्के झाले. म्हैैसूरच्या वितरकांनी 8.50 कोटी दिले आणि 20 टक्के नुकसान झाले. निजाममध्ये 9 कोटींमध्ये खरेदी करण्यात आला आणि 25 टक्के तोटा झाला. पूर्व क्षेत्रासाठी (बंगाल, बिहार, उडीसा) वितरकांनी 12.5 कोटींत सिनेमा खरेदी केला.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून वाचा बंगालमध्ये झाला चांगला बिझनेस.... शाहरुखने स्वतः केले प्रमोशन....
बातम्या आणखी आहेत...