आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जियाच्या निधनानंतर समोर आलेल्या या PHOTOS ने वाढवला प्रकरणातील गुंता

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(जिया खानच्या पार्थिवाचे छायाचित्र)
मुंबईः बॉलिवूड अभिनेत्री जिया खानला या जगाचा निरोप घेऊन दोन वर्षे उलटली आहेत. 2 जून 2013 रोजी जिया तिच्या मुंबईतील राहत्या घरी मृतावस्थेत आढळली होती. जियाने आत्महत्या केली, असे म्हटले जाते. जियाच्या मृत्यूच्या सहा दिवसांनी तिची आई राबिया खान यांनी पोलिसांना एक सुसाइड नोट दिली होती. त्यामध्ये अभिनेता आदित्य पांचोलीचा मुलगा सूरज पांचोलीने आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याचे जियाने म्हटले होते.
या प्रकरणाला चार महिन्यांनी पुन्हा एक नवे वळण आले. जिया खानच्या वकिलांनी पहिल्यांदा तिच्या पार्थिवाची छायाचित्रे मीडियासमोर आणली. ही छायाचित्रे दाखवून जियाने आत्महत्या केली नसून तिची हत्या झाली असल्याचे वकिल दिनेश तिवारी आणि तिच्या कुटुंबीयांनी म्हटले होते.
या छायाचित्रांमुळे थंड पडलेले प्रकरण पुन्हा एकदा तापले आणि संशयाची सुई सूरज पांचोलीकडे वळली. ही छायाचित्रे प्रकाशित झाल्यानंतर राबिया खान यांनी सीबीआय चौकशीची मागणी केली होती. पोलिस प्रकरणाची नीट चौकशी करत नसल्याचा आरोप त्यांनी लावली होता. आत्तापर्यंत या प्रकरणातला गुंता वाढतच गेला आहे. मात्र जियाने आत्महत्या केली की तिची हत्या झाली, हे आजही न उलगडलेले कोडे आहेत.
जिया खानच्या पार्थिवाची समोर आलेली छायाचित्रे मन हेलावून टाकणारी आहेत. तिच्या चेहरा आणि मानेवर अनेक जखमा आढळून आल्या. जियाची ही छायाचित्रे तुम्ही पुढील स्लाईड्समध्ये पाहू शकता...