आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जियाच्या मृत्यूनंतर समोर आले होते हे Photos, प्रकरणात आला होता Twist

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(जिया खानचा मृत्यूनंतरचा फोटो)
मुंबई- बॉलिवूड अभिनेत्री जिया खान आत्महत्या प्रकरणाला नवीन वळण आले आहे. या प्रकरणात बुधवारी (9 डिसेंबर) सीबीआयने चार्जशीट दाखल केले आहे. यात अभिनेता आदित्य पांचोलीचा मुलगा सूरज पांचोलीवर ठपका ठेवण्यात आला आहे. इतकेत नव्हे तर, चार्जशीटमध्ये समोर आले, की जिया खान प्रेग्नेंट होती आणि तिचाय बॉयफ्रेंड सूरज पांचोलीने भ्रूण टॉयलेटमध्ये फेकले होते.
मृत्यूनंतर समोर आलेल्या फोटोंमुळे उपस्थित झाले प्रश्न-
2 जून 2013 जियाचा मृतदेह तिच्या जुहू स्थित घरी बेडरूममध्ये आढळला होता. त्यावेळी सर्वांना वाटले होते, की जियाने आत्महत्या केली आहे. इतकेच नव्हे, जियाची आई राबिया खान यांनी 6 दिवसांनंतर पोलिसांना एक सुसाइड नोट दिली होती. त्यामध्ये जियाच्या आत्महत्येला सूरज पांचोली जबाबदार असल्याचे सांगण्यात आले. परंतु या प्रकरणात जेव्हा जियाच्या वकिलांनी पहिल्यांदा तिच्या मृत्यूचे फोटो मीडियासमोर आणले तेव्हा या प्रकरणाने वेगळे वळण घेतले. हे फोटो जियाच्या मृत्यूनंतर घेण्यात आले होते.
हे फोटो पाहून जियाचे वकील दिनेश तिवारी आणि कुटुंबीयांनी याचिका दाखल केली होती, की जियाने आत्महत्या केली नसून तिची हत्या करण्यात आली आहे. नंतर राबिया यांनी पोलिसांवर तपास नीट न केल्याचा आरोप लावून सीबीआय तपासाची मागणी केली.
मृत्यूनंतर समोर आलेले जिया खानचे फोटो विचलित करणारे आहेत. यामध्ये तिच्या चेह-यावर आणि मानेवर काही जखमांचे निशाण दिसत आहेत. जियाचे मृत्यूनंतरचे फोटो पाहण्यासाठी पुढील स्लाइड्सवर क्लिक करा...
बातम्या आणखी आहेत...