आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'कट्टप्पा\'च्या मुलीने लिहिले पंतप्रधानांना पत्र, म्हटले-पैसा माणुसकीपेक्षा मोठा झाला का?

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - 'बाहुबली' मधील कटप्पा म्हणजे अॅक्टर सत्यराज यांची मुलगी दिव्या सत्यराज सध्या चर्चेत आहे. एका दैनिकाने दिलेल्या वृत्तानुसार दिव्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एक पत्र लिहून काही औषध कंपन्यांच्या विरोधात कारवाई करण्याची मागणी केली आहे. 

आहारतज्ज्ञ (न्यूट्रिशनिस्ट) असलेल्या दिव्याने दावा केला आहे की, काही फार्मा कंपन्या तिला त्यांचे प्रोडक्ट्स प्रिस्क्राईब करण्यासाठी फोर्स करत होत्या. पण त्या प्रोडक्ट्समुळे डोळ्यांवर गंभीर परिणाम होण्याबरोबरच जीवालाही धोका असल्याची शक्यता असल्याचे दिव्याने पत्रात म्हटले आहे. 

दिव्याने जेव्हा या फार्मा कंपन्यांचे म्हणणे ऐकले नाही, तेव्हा या कंपन्यांकडून दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला. तसेच त्यासाठी राजकीय शक्तीचा वापर करण्यात आल्याचेही दिव्याने पंतप्रधानांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे. या सर्वासाठी दिव्याने पंतप्रधानांना पत्र लिहून मदत मागितली आहे. अशा परिस्थितीत मध्यमवर्गातील कुटुंबांच्या सुरक्षेची जबाबदारी कोण उचलणार असे दिव्याने म्हटले आहे. 
 
 
बातम्या आणखी आहेत...