आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

22 वर्षांनंतरही या हायप्रोफाइल खून प्रकरणाचा उलगडा नाही, बंद केली फाइल

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दिव्‍या भारती - Divya Marathi
दिव्‍या भारती
मुंबई - हायप्रोफाइल शीना बोरा हत्‍याकांड प्रकरणी पोलिसांनी शीनाची आई इंद्राणी मुखर्जीसह सावत्र वडील पीटर मुखर्जी, संजीव खन्ना आणि चालक श्याम वीर राय यांनी अट केली. मात्र, हा खून नेमका कुणी आणि कशासाठी केला, याचा तपास अजूनही सुरू आहे. त्‍या अनुषंगाने divyamarathi.com आहे 22 वर्षांपूर्वी झालेल्‍या अभिनेत्री दिव्‍या भारती खुन प्रकरणाबद्दल. दिव्‍या भारतीचा मृत्‍यू नेमका कशा झाला, हा प्रश्‍न अजूनही अनुत्‍तरित असून, पोलिसांनी ही फाइल आता बंद केली आहे.
सर्वच चित्रपट झाले सुपर डुपर हिट
वयाच्‍या अवघ्‍या विशीतच दिव्‍या भारतीने अनेक हिट सिनेमे दिले. तिने ज्‍याही चित्रपटात काम केले तो सिनेमा सुपर डुपर हिट झाला. एवढेच नाही तर नव्‍वदच्‍या दशकात ती बहुतांश तरुणांच्‍या गळ्यातील ताईत बनली होती.
दिव्‍या भारतीचा कसा झाला मृत्‍यू ?
14 फेब्रुवारी 1974 मध्‍ये जन्‍मलेल्‍या दिव्‍या भारतीचा 5 एप्रिल 1993 या दिवशी जीवन प्रवास कायमचाच थांबला. 5 एप्रिलच्‍या रात्री मुंबईतल्या वर्सोव्याच्या पाचव्या मजल्यावर असलेल्‍या फ्लॅटमधून ती खाली पडली. यात तिचा जागीच मृत्‍यू झाला. मात्र, तिला खाली कुणी ढकलून दिले. तिच्‍यासोबत प्‍लॅटमध्‍ये कोण होते, याचा शोध पोलिस अजूनही घेऊ शकले नाहीत. त्‍यामुळेच केवळ अपघाती मृत्‍यू म्‍हणून तिची फाइल कायमचीच बंद करण्‍यात आली.
लग्‍नानंतर काहीच महिन्‍यांत मृत्‍यू
यशाच्‍या शिखरावर असतानाच दिव्‍या भारतीने लग्‍न केले होते. विश्वात्मा, शोला और शबनम, दिवाना, रंग या सारख्‍या गाजलेल्‍या हिंदी चित्रपटांत तिची प्रमुख भूमिका होती. तिने तेलुगू भाषेतील 'बोब्बिली राजा' चित्रपटापासून आपल्‍या करिअरला सुरुवात केली होती. मात्र, लग्‍नाच्‍या काहीच महिन्‍यांत तिचा मृत्‍यू झाला.
पुढील स्‍लाइड्सवर पाहा कोणते प्रश्‍न अजूनही अनुत्‍तरित....