आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आता अशी दिसते देशाची पहिली MISS WORLD, ग्लॅमरस जग सोडून अज्ञातवासात जगतेय आयुष्य

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबईः जगात सौंदर्य स्पर्धांमध्ये सर्वात महत्त्वाची स्पर्धा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ‘मिस वर्ल्ड 2017’चा मुकूट भारताच्या मानुषी छिल्लरने पटकावला आहे. तब्बल 17 वर्षांनतर भारताच्या सौंदर्यवतीने मिस वर्ल्ड स्पर्धेत बाजी मारली आहे. चीनमधील सान्या येथे शनिवारी मिस वर्ल्ड 2017 ही स्पर्धा रंगली. 51 वर्षांपूर्वी 17 नोव्हेंबर 1966 रोजी रीता फारिया नावाच्या भारतीय तरुणीने मिस वर्ल्डचा किताब आपल्या नावी केला होता. मिस वर्ल्ड बनणारी रीता पहिली भारतीय आणि आशियाई तरुणी आहे. मिस वर्ल्डसोबतच रीता या एक डॉक्टर (फिजिशिअन) आहेत. 

 

येथून पूर्ण केले MBBSचे शिक्षण...  
- रीता यांचा जन्म 1945 मध्ये मुंबईत एका गोवन (मुळचे गोव्याचे) कुटुंबात झाला. 
- रीता यांनी ग्रॅण्ट मेडिकल कॉलेज आणि सर जमशेदजी जीजाबाई ग्रुप ऑफ हॉस्पिटल मुंबई येथून एमबीबीएसचे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर त्यांनी लंडनच्या किंग्स कॉलेजमधून उच्च शिक्षण घेतले. 
- वर्षभर मॉडेलिंग क्षेत्रात काम करुन रीता यांनी वैद्यकिय शिक्षण पूर्ण केले आणि याच क्षेत्रात करिअर बनवले. 
-  रीता पहिल्या अशा भारतीय मॉडेल आहेत, ज्यांची क्रेज केवळ भारतातच नव्हे तर अमेरिका, आयरलँड येथेही बघायला मिळाली. मात्र काही काळ मॉडेलिंग केल्यानंतर त्यांने मेडिकल क्षेत्रात कार्य करण्याचा निर्णय घेतला आणि ग्लॅमरस आयुष्य सोडून आता अज्ञातवासात आपले जीवन व्यतित करत आहेत.

 

1971 मध्ये झाले लग्न
- रीता यांनी डेविड पॉवेल यांच्यासोबत 1971 मध्ये लग्न केले. 
- लग्नानंतर 1973 साली हे दाम्पत्य डबलिन येथे स्थायिक झाले. 
- 1998 मध्ये फेमिना मिस इंडियाच्या परीक्षकाच्या रुपात रीता यांनी फॅशन दुनियेत कमबॅक केले होते. 
- मिस वर्ल्ड स्पर्धेतदेखील रीता यांनी परीक्षकाची भूमिका बजावली आहे.

 

ग्लॅमरपासून दूर राहणे आहे पसंत
- एका मुलाखतीत त्यांनी सांगितले, "मला पूर्वी ग्लॅमरस आयुष्य पसंत होते. मात्र मिस वर्ल्ड बनल्यानंतर लोकांना भेटणे मला आवडेनासे झाले. सर्व दिखावा होता. जीवन जगण्याचा खरा आनंद लोकांची सेवा करण्यात आले. त्यामुळे ग्लॅमरस आयुष्यापासून लांब डॉक्टरी पेशात मी आनंदी आहे." 

 

युकेत झाला सन्मान
- काही वर्षांपूर्वी रीता युनायडेट किंगडमच्या गोवन फेस्टिव्हलमध्ये दिसल्या होत्या. येथे गोवन कम्युनिटीच्या वतीने त्यांना सन्मानित कऱण्यात आले होते. 


पुढील स्लाईड्समध्ये पाहा, भारताला पहिल्यांदा मिस वर्ल्डचा किताब मिळवून देणा-या रीता यांचे निवडक PHOTOS...

बातम्या आणखी आहेत...