आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS: हा आहे ड्रॅकुला महल, अक्षय कुमार येथे करणार फिल्मचे शूटिंग

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(ड्रॅकुला महल, इनसेटमध्ये अक्षय कुमार)
आपल्या सिनेमांच्या शूटिंगसाठी निर्माते परदेशातील एग्जॉटिक लोकेशन्सच्या शोधात असतात. प्रभूदेवाने आपल्या आगामी 'सिंह इज ब्लिंग' या सिनेमाच्या शूटिंगसाठी ड्रॅकुला महलची निवड केली आहे. बातम्यांनुसार, सुरुवातीला या सिनेमाच्या क्लायमॅक्ससाठी केपटाऊनची निवड करण्यात आली होती. मात्र नंतर रोमानियामध्ये शूटिंग करण्याचा निश्चित झाले.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, 'सिंह इज ब्लिंग'चा क्लायमॅक्स ट्रांसिल्वेनिया येथील ड्रॅकुला महल नावाने प्रसिद्ध असेलल्या ब्रेन कॅसल येथे शूट करण्यात येणार असून जुलै महिन्यात शूटिंगला सुरुवात होणारेय.
ड्रॅकुला महलविषयी...
ड्रॅकुला महल हे रोमानियातील राष्ट्रीय स्मारक आहे. हे ट्रांसिल्वेनिया आणि वालाचिया बॉर्डरवर स्थित आहे. 1920 मध्ये क्वीन मॅरीचे हे निवासस्थान होते. मात्र आता हे टुरिस्टसाठी उघडण्यात आले असून येथे म्युझियम तयार करण्यात आले आहे. क्वीन मॅरीच्या संग्रहातील आर्ट आणि फर्निचर येथे बघायला मिळतं.
2 ऑक्टोबर रोजी रिलीज होणार सिनेमा...
प्रभूदेवा दिग्दर्शित हा सिनेमा अश्विनी यार्डी प्रोड्युस करत आहे. अक्षय कुमारसह अॅमी जॅक्सन, विवेक ओबरॉय, लारा दत्ता आणि बिपाशा बसू यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका या सिनेमात आहेत. यावर्षी 2 ऑक्टोबर रोजी सिनेमा बॉक्स ऑफिसवर दाखल होणारेय.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा, ड्रॅकुला महलची खास छायाचित्रे...