मुंबईः अभिनेता
अजय देवगण स्टारर 'दृश्यम' या आगामी सिनेमाचा नुकताच ट्रेलर लाँच करण्यात आला आहे. सिनेमाचा ट्रेलर तीन मिनिटांचा आहे. या ट्रेलरमध्ये अजय देवगण सामान्य नागरिकाच्या भूमिकेत दिसणार आहे.
'दृश्यम' हा सिनेमा एक मर्डर मिस्ट्री असून सिनेमात श्रिया सरन अजय देवगणच्या पत्नीची भूमिका साकारत आहे.
अजयच्या कुटुंबावर अपहरणाचा आरोप लागतो. ज्या मुलाचं अपहरण होतं, तो तब्बूचा मुलगा असतो. 'दृश्यम'मध्ये तब्बू एका पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार आहे.
व्हिडिओवर क्लिक करा आणि पाहा 'दृश्यम'ची पहिली झलक...