आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Drunk Man Misbehave With Raveena Tandon, Video Viral

गैरवर्तन करणा-या इसमाला रविना टंडनने सुनावले खडे बोल, VIDEO झाला व्हायरल

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लॉस एंजिलिस - बॉलिवूड अभिनेत्री रविना टंडनला अलीकडेच अमेरिकेत एका अडचणीचा सामना करावा लागला. अमेरिकेत तिची छेड काढून तिला त्रास देण्यात आल्याचा आरोप तिने केला आहे. ही घटना लॉस एंजिलिसमधील स्वातंत्र्यदिन सोहळ्याच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात घडली. या घटनेचा व्हिडिओ यूट्युबवर व्हायरल झाला आहे. यामध्ये रविनासोबत गैरवर्तन करणा-या इसमाला ती खडे बोल सुनावताना दिसतेय. रविनाने ट्विटद्वारे या घटनेबाबत माहिती दिली होती.
रविनाचे काय केले होते ट्विट?
रविनाने ट्विटमध्ये म्हटले की, ''LA (लॉस एंजल्स) मध्ये इंडिपेंडेंस डे सेलिब्रेशनदरम्यान दोन दिवस चांगले गेले. पण दुःखद घटना म्हणजे शेवट वाईट झाला. सर्व काही ठीक सुरू होते. पण त्याचवेळी एक मद्यधुंद व्यक्ती स्टेजवर आला. या ट्विटमध्ये रविनाने त्या व्यक्तीचे नावही सांगितले. रविनाने लिहिले की, ''नीरज अग्निहोत्रीने घाणेरड्या भाषेत कमेंट्स करत चुकीचे वर्तन करण्यास सुरुवात केली. नेमके त्यावेळी सेक्युरिटी गार्ड्स स्टेजच्या खाली होते. त्यामुळे त्यांना लगेचच स्टेजवरून खाली उतरवता आले नाही. हे कृत्य करणारा व्यक्ती आयोजकांपैकीच एक होता आणि त्याच्या मुलांना माझ्याबरोबर कारमध्ये येऊ दिले नाही, त्यामुळे तो नाराज होता. सेक्युरिटी आणि प्रोटोकॉलमुळे त्यामुलांना गाडीत बसवता आले नाही, असे रविनाने सांगितले.
रविनाच्या ट्विट्सनुसार घाणेरड्या कमेंट्स केल्यामुळे मला इतर लोकांना बोलवावे लागले. मीही त्याला चांगलेच सुनावले. या सोहळ्यादरम्यान अनेक चांगली माणसे भेटली. पण त्या व्यक्तीने सर्व मजा घालवली.
@TandonRaveena ने आणखी एका ट्विटमध्ये लिहिले, ''कार्यक्रमात तुम्ही सर्वांनाच आनंदी ठेवू शकत नाही. या समस्या येतातच. ज्या लोकांना तुम्हाला भेटता येत नाही, ते स्वतःचा अपमान समजतात, आणि अशा प्रकारे बदला घेण्याचा प्रयत्न करतात.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा, इव्हेंटमधील रविनाची काही छायाचित्रे आणि तिचे ट्विट्स...