आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'बाहुबली'च्या 'देवसेने'ला या अभिनेत्रीने दिला आहे आवाज

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - 'बाहुबली २' चित्रपटातील प्रभासला दमदार आवाज दिला तो मराठी अभिनेता शरद केळकरने. यानंतर चित्रपटातील देवसेनेला कोणी आवाज दिला यावरुन चर्चा होऊ लागली. 
चित्रपटातील देवसेनेच्या भूमिकेला शोभेल असा आवाज दिला आहे अभिनेत्री आणि डबिंग आर्टीस्ट स्मिता मल्होत्राने. 
 
गेल्या 18 वर्षापासून डबिंगचे काम करणाऱ्या स्मिता मल्होत्राने एका मुलाखतीत 'बाहुबली'चे डबिंग करताना आलेला अनुभव शेअर केला.
 
स्मिताने सांगितले की, "'देवसेना'साठी डबिंग करणे माझ्यासाठी एक उत्तम संधी होती. मला डबिंगसाठी कॉल आला होता. एक्जीक्युटीव प्रोड्युसर देविकासोबत अनेक वेळा मीटिंग 
झाली. त्यांना माझ्या आवाजात वजन हवे होते. ज्यामुळे तो कोणा राजकुमारीचा आवाज आहे, असे वाटायला हवे. यासाठी तीन सेशन करण्यात आले आणि चौथ्या सेशनमध्ये माझे 
नाव ठरविण्यात आले. मी देवसेनेच्या डायलॉग्जसाठी प्रकाश झा च्या स्टुडिओमध्ये तीन दिवसांपर्यंत डबिंग केली. डबिंगनंतर राजामौली यांच्या सांगण्यानुसार, काही डायलॉग्जची डबिंग करण्यात आली."  
 
स्मिता आतापर्यंत अनुष्काला भेटलेली नाही. स्मिताने 'परिणीता' या २००५ साली आलेल्या चित्रपटात काम केले आहे. याशिवाय तिने शुभा मुद्गल यांच्या 'अब के सावन ऐसे बरसे' या 
गाण्यात दिसून आली होती. 
 
स्मिताने इंडस्ट्रीमध्ये सनी लिओनी, कॅटरीना कैफ, नर्गिस फाक्री, एली एवराम, हेजल किच यांसारख्या अभिनेत्रींसाठी डबिंग केले आहे. 
 
 
पुढच्या स्लाईडवर पाहा,  स्मिता मल्होत्राचे काही फोटोज्...
बातम्या आणखी आहेत...