आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महिला आयोगापर्यंत वाद गेल्यानंतर नवाजुद्दीनने पुस्तक घेतले होते मागे, या महिलेने दिला सल्ला

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पत्नी अंजलीसोबत नवाजुद्दीन सिद्दीकी. - Divya Marathi
पत्नी अंजलीसोबत नवाजुद्दीन सिद्दीकी.
'अॅन ऑर्डिनरी लाइफ' जगणारा आणि लिहिणारा कलाकार म्हणजे नवाजुद्दीन सिद्दीकी. नवाजुद्दीनची  'अॅन ऑर्डिनरी लाइफ' बायोग्राफी प्रकाशापूर्वीच वादग्रस्त ठरली आणि एवढी वादग्रस्त ठरली की प्रकाशनाच्या आधीच हे पुस्तक परत घेण्याची नामुष्की नवाजुद्दीनवर ओढवली. या पुस्तकात नवाजुद्दीनने बालपणापासून बॉलिवूडमधील करिअरपर्यंत त्याच्या आयुष्यात आलेल्या महिलांबद्दल लिहिले होते. एक्स गर्लफ्रेंड्सबरोबरचे किस्से जगजाहीर करण्याने नवाजुद्दीन चांगला फसला. ही गोष्ट पोलिस स्टेशन आणि महिला आयोगापर्यंत गेली. त्याच्याविरोधात एफआयआर दाखल झाला आणि महिला आयोगात तक्रार देखील. एका पुस्तकाने एवढे वाद ओढवून घेतल्यानंतर नवाजुद्दीनने अखेर पुस्तक परत घेतले. मात्र आता खुलासा झाला आहे, की पुस्तक परत घेण्याचा सल्ला नवाजला त्याची पत्नी अंजलीने दिला होता. 
 
फ्रेंड्स एवढे नाराज होतील याचा अंदाज नव्हता... 
- नवाजुद्दीन म्हणाला, की मला याचा जराही अंदाज नव्हता की माझे शब्द माझ्या मित्रांना एवढे दुखावणारे असतील. 
- पुस्तकावरुन वाद वाढल्यानंतर नवाजुद्दीनची पत्नी अंजलीने त्याला त्याची चूक सुधारण्याचा सल्ला दिला. पत्नीच्या सांगण्यावरुन नवाजने त्याच्या शब्दांनी दुखावलेल्यांची सोशल मीडियावर माफी मागितली आणि पुस्तक मागे घेतले.   
 
पुढील स्लाइडमध्ये वाचा, हिंदीत का लिहिले पुस्तक... 
बातम्या आणखी आहेत...