आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बिग बींसह बॉलिवूड कलाकारांनी Earthquake वर दिल्या प्रतिक्रिया

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - नेपाळमध्ये आलेल्या शक्तीशाली भूकंपाने शेकडो लोकांचा बळी घेतला आहे. त्याचप्रमाणे शेकडो नागरीक जखमी झाले आहेत. अनेक इमारती जमिनदोस्त झाल्या आहे. नऊ मजली धारहारा मनोरा आणि जानकी मंदिर पूर्णपणे उद्‍धवस्त झाले आहे. ढिगार्‍याखाली 450 लोक अडकल्याची माहिती मिळाली आहे. त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मदतकार्य युद्धपातळीवर सुरु झाले आहे.
नेपाळच नव्हे तर दिल्लीसह उत्तर भारत आज दोनदा भूकंपाच्या धक्क्याने हादरला. तर महाराष्ट्रातील नागपुर, चंद्रपूरात भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले आहेत.
या भूकंपात अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. बॉलिवूड कलाकारांनी ट्विटरच्या माध्यमातून या नैसर्गिक संकटाविषयी दुःख व्यक्त केले आहे. अमिताभ बच्चन यांनी ट्विट केले, "Seeing devastating pictures and news of the earthquake in Nepal ! Prayers that all is well and all are safe .. !!"
बिग बींसह पूजा भट, जॅकी भगनानी, सोफी चौधरी, सोनू सूद आणि इतर कलाकारांनीही याविषयी ट्विट केले.
काय म्हणाले, कलाकार जाणून घ्या पुढील स्लाईड्समध्ये...