आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Bollywood Actor Emraan Hashmi Book On His Son's Struggle With Cancer

इमरान हाश्मीने आपल्या मुलाच्या कॅन्सर लढ्याचे अनुभव मांडले पुस्तकात

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुलगा अयानसोबत इमरान हाश्मी - Divya Marathi
मुलगा अयानसोबत इमरान हाश्मी

मुंबईः अभिनेता इमरान हाश्मी लिखित एक पुस्तक लवकरच प्रकाशित होणार आहे. या पुस्तकात इमरानने आपल्या पाच वर्षांच्या मुलाच्या कॅन्सर लढ्याचे अनुभव यामध्ये मांडले आहेत. नऊ वर्षांपूर्वी इमरान त्याची गर्लफ्रेंड परवीन शाहनीसोबत विवाहबद्ध झाला होता. त्यांचा एक मुलगा असून त्याचे नाव अयान आहे.
गेल्यावर्षी अयानच्या किडनीमध्ये कॅन्सची गाठ असल्याचे समोर आले होते. शस्त्रक्रिया करुन ती गाठ काढण्यात आली. शस्त्रक्रियेनंतर त्याच्यावर केमोथेरपीची प्रक्रिया केली गेली. अयानला उपचारासाठी परदेशात नेण्यात आले होते.
याविषयी इमरानने ट्विट करुन सांगितले, ''गेली दोन वर्षे माझ्या आयुष्यातील असे दिवस होते, जेव्हा मला माझे दोन महान गुरु भेटले. एक कॅन्सर आणि दुसरा माझा मुलगा.'' त्याने पुढे लिहिले, ''मी पेंग्विनच्या टीमचा आभारी आहे.'' पेंग्विन बुक्स इमरानचे हे पुस्तक प्रकाशित करत आहे. पुढील वर्षी हे पुस्तक प्रकाशित होणार आहे.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा, मुलगा अयानसोबतची इमरानची निवडक छायाचित्रे...