आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इम्रानच्‍या को-स्‍टारवर रस्‍त्यांवर राहण्‍याची वेळ, MMS मुळे कुटुंबियांनी काढले घरातून बाहेर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - अभिनेता इम्रान हाश्मीसोबत काम केलेल्‍या अलिसा खानवर दिल्लीतील रस्‍त्यांवर राहण्‍याची वेळ आली आहे. ती कित्‍येक दिवसांपासून दिल्लीच्‍या ग्रेटर कैलाशच्‍या रस्‍त्यावर राहत आहे. तिच्‍या मंदिरात झोपण्‍याची वेळ आली असून, जेवणासाठी पैसेही नाहीत. बॉयफ्रेंडसोबत वाद झाल्‍यानंतर तिच्‍या कुटुंबियांनी तिला घरातून बाहेर काढल्‍याचे सांगितले जात आहे. इम्रानसोबत तिने 'आइना' चित्रपटात काम केले आहे. ही फिल्म अजून रिलीज झाली नाही.
- अलिसा ही मूळची गाझियाबाद येथील आहे.
- तिच्‍या बॉयफ्रेंडने 18 मार्चला तिचा व्‍हिडियो व्‍हायरल करण्‍याची धमकी दिली होती;
- पर्सनल व्‍हिडियो सोशल साइटवर न टाकण्‍याच्‍या बदल्‍यात त्‍याने 50 लाख रुपयांची मागणी केली होती.
- अलिसाने पैसे दिले नाही म्‍हणून त्‍याने हा व्‍हिडियो व्‍हायरल केला.
- अलिसा ने कहा, ''माझा भाऊ आणि आईने मला घरातून बाहेर काढले आहे. आता मी कुठे जाऊ. तोंड लपवण्‍यासाठी मला कधी मंदिर तर, कधी फ्रेंडच्‍या घरी जावे लागते."
अलिसाने पोलिसांना सांगून सोशल साईटवरुन व्‍हिडियो काढला..
- एमएमएस व्‍हायरल झाल्‍यानंतर अलिसीने पोलिसात तक्रार केली.
- मुंबई साइबर सेलमध्‍ये तक्रार केल्‍यानंतर नगर कोतवालीमध्‍येही तक्रार केली.
- पोलिसांनी काही साईट्सवरुन हा व्‍हिडियो डिलेट केला आहे.
कोण आहे अलिसा खान?
- अलिसाने मुंबईत येऊन मॉडलिंगमध्‍ये करियरला सुरूवात केली.
- 'माय हसबंड वाइफ' फिल्ममध्‍ये ऋषी कपूर आणि शक्ती कपूरसोबत तिने काम केले आहे.
- 2014 मे डायरेक्टर केसी बोकाडिया यांनी 'डर्टी डांसर' चित्रपट काढला. त्‍यामध्‍येही ती होती.
- जिम्मी शेरगिलच्‍या 'रांग नंबर' चित्रपटातही तिला भूमिका मिळाल्‍याचे सांगितल्‍या जाते.
- इम्रान हाश्‍मीसोबत तिची शुटिंग पूर्ण झाली आहे. ऑगस्‍ट महिन्‍यात हा चित्रपट प्रदर्शित होईल.
पुढील स्‍लाइड्सवर पाहा, या अभिनेत्रीचे काही खास फोटो..
बातम्या आणखी आहेत...