आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इम्रान हाश्मीची हीरोईन अलिसा खानचे लग्न, 15 दिवसांपूर्वी MMSमुळे कुटुंबियांनी काढले होते घराबाहेर

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - अलीकडेच चर्चेत आलेली अभिनेत्री अलिसा खान हिने १७ जून रोजी चित्रपट निर्माता लव कपूरसोबत लग्न केल्याची बातमी आहे. स्वतः अलिसाने लग्नाची उघड केली आहे. तिचा नवरा लव कपूर मुळचा हरिद्वारचा आहे. अनेक सिनेमे आणि मालिकांची निर्मिती त्याने केली आहे. लग्नानंतर लवकरच मुंबईत शिफ्ट होणार असल्याची माहिती लव कपूरने दिली.
काय घडले होत अलिसासोबत...
- अभिनेता इम्रान हाश्मीसोबत काम केलेल्‍या अलिसा खानवर काही दिवसांपूर्वी दिल्लीतील रस्‍त्यांवर राहण्‍याची वेळ आली होती. अनेक दिवस तिने दिल्लीच्‍या ग्रेटर कैलाशच्‍या रस्‍त्यावर काढले. तिच्‍यावर मंदिरात झोपण्‍याची वेळ आली होती. शिवाय जेवणासाठीही तिच्याकडे पैसे नव्हते.
- बॉयफ्रेंडसोबत वाद झाल्‍यानंतर तिच्‍या कुटुंबियांनी तिला घरातून बाहेर काढल्‍याचे सांगितले गेले होते.
- इम्रानसोबत तिने 'आइना' चित्रपटात काम केले आहे. ही फिल्म अजून रिलीज झाली नाही.
- आलिसा ही मूळची गाझियाबाद येथील आहे.
- तिच्‍या बॉयफ्रेंडने 18 मार्चला तिचा व्‍हिडियो व्‍हायरल करण्‍याची धमकी दिली होती.
- पर्सनल व्‍हिडियो सोशल साइटवर न टाकण्‍याच्‍या बदल्‍यात त्‍याने 50 लाख रुपयांची मागणी केली होती.
- अलिसाने पैसे दिले नाही म्‍हणून त्‍याने हा व्‍हिडियो व्‍हायरल केला होता.
- अलिसाने म्हटले होते, ''माझा भाऊ आणि आईने मला घरातून बाहेर काढले आहे. आता मी कुठे जाऊ. तोंड लपवण्‍यासाठी मला कधी मंदिर तर, कधी फ्रेंडच्‍या घरी जावे लागते."
अलिसाने पोलिसांना सांगून सोशल साईटवरुन व्‍हिडियो काढला..
- एमएमएस व्‍हायरल झाल्‍यानंतर अलिसीने पोलिसात तक्रार केली.
- मुंबई साइबर सेलमध्‍ये तक्रार केल्‍यानंतर नगर कोतवालीमध्‍येही तक्रार केली.
- पोलिसांनी काही साईट्सवरुन हा व्‍हिडियो डिलेट केला आहे.

पुढे वाचा, कोण आहे अलिसा खान?
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...