आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

VIDEO : 'बिग बॉस'ची एक्स कंटेस्टंट म्हणाली, हज यात्रेदरम्यान झाले सेक्श्युअल हॅरॅशमेंट

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - 'बिग बॉस-7' ची एक्स कंटेस्टेंट आणि अॅक्ट्रेस सोफिया हयातने नुकतेच एक धक्कादायक वक्तव्य केले आहे. सोफियाने सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट करून असा दावा केला आहे की, हज यात्रेदरम्यान मक्का (मुस्लिमांचे धार्मिक स्थळ) येथे तिला सेक्श्युअली असॉल्ट करण्यात आले. सोफिया मक्का येथे तिचा होणारा नवरा व्लाड स्टॅन्स्यु (Vlad Stanescu) बरोबर गेली होती. 

सोशल मीडियावर पोस्ट केला व्हिडीओ... 
सोफियाने एक व्हिडीओ पोस्ट करून या संपूर्ण प्रकाराबाबत माहिती दिली. मक्का येथे गर्दी असल्याने मी व्लाडपासून दूर झाले. त्याचवेळी रांगेत असलेल्या एका अनोळखी व्यक्तीने मला चुकीच्या पद्धतीने स्पर्श केला आणि धक्का देण्याचाही प्रयत्न केला. तो मला त्रास देण्याचा प्रयत्न करत होता. मी वळून त्याच्याकडे पाहिले पण तो सारखे धक्के मारत होता. या संपूर्ण गोंधळात माझ्या डोक्यावरील हिजाब माझ्या गळ्यात अडकू लागला आणि मी जोराने ओरडले. त्याचवेळी काही लोक माझ्या मदतीला धावून आले आणि मला वाचवले. या संपूर्ण प्रकारामुळे मी फार दुःखी आहे. कारण इस्लाम महिलांचा आदर करण्याची शिकवण देते, आणि अशी चुकीची कामे करत असतील तर ते मुस्लिमच नाहीत. 

मार्च महिन्यात झाली एंगेजमेंट 
सोफियाने मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात बॉयफ्रेंड व्लाड स्टॅन्सु (Vlad Stanescu) बरोबर एंगेजमेंट केली होती. व्लाड रोमानियामध्ये इंटेरियर डिझायनर आहे. त्याने सौदी अरबचे किंग फाहद, स्वीडनची राणी स्लिव्हीया आणि केंब्रिजच्या प्रिन्स विल्यम ड्यूकसह अनेक मोठ्या लोकांसाठी काम केले आहे. एंगेजमेंटनंतर सोफिया व्लाडने एक बोल्ड फोटोशूटही केले होते. त्याचे फोटोही व्हायरल झाले होते. 

पुढील स्लाइड्सवर वाचा, सोफियाबाबत.. पाहा तिचे व्लाडबरोबरचे PHOTO..
अखेरच्या स्लाइडवर पाहा, व्हिडीओ..
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.) 
 
बातम्या आणखी आहेत...