आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Kangana\'s Ex Boyfriend Adhyayan Suman Talking About Hrithik Kangana Controversy

कंगना मांत्रिकाकडे घेऊन गेली, जेवणात मिसळे रक्त, वाचा धक्कादायक खुलासे

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबईः अभिनेत्री कंगना रनोटच्या अडचणी काही कमी होताना दिसत नाहीयेत. हृतिकनंतर आता कंगनाच्या पूर्वाश्रमीच्या प्रियकराने अनेक धक्कादायक खुलासे केले आहे. शेखर सुमन यांचा मुलगा आणि अभिनेता अध्ययन सुमनसोबत काही काळ कंगनाचे अफेअर राहिले आहे. याकाळात कंगना त्याच्यासोबत कशी वागली, याचा खुलासा स्वतः अध्ययनने केला आहे.
त्याने सांगितले, "कंगना मला मारहाण करायची. शिवीगाळ आणि काळी जादू करायची." 'राज 2 'या सिनेमात अध्ययन आणि कंगना यांनी एकत्र काम केले आहे. दोघांचे वर्षभर अफेअर होते, मात्र नंतर ब्रेकअप झाले. त्यानंतर अध्ययन देश सोडून निघून गेला. काही वर्षांनी तो परतला आहे.

अध्ययन म्हणाला, हृतिकला माझा पाठिंबा..
- कंगना-हृतिक वादाविषयी अध्ययनने divyamarathi.com सोबत बातचित केली. या मुलाखतीत त्याने अनेक धक्कादायक खुलासे केले आहे.
- "माझा हृतिकला पाठिंबा आहे. त्याच्यासोबत जे घडतंय, त्याचा अंदाज मी बांधू शकतो. अशाप्रकारचा मानसिक त्रास मी स्वतः सहन केला आहे. त्याला मानसिकरित्या टॉर्चर करण्यात येत आहे. लोकांना लवकरच सत्य कळेल."
- "कंगनाच्या स्टारडमला नुकसान पोहचवण्याचा माझा हेतू नाहीये. मात्र ती एका व्यक्तीवर निशाणा साधून स्वतः निरागस बनण्याचा प्रयत्न करत आहे. कंगनाने चुकीच्या गोष्टी पसरवल्या आहेत. तिच्याविषयीचा हा माझा शेवटचा इंरव्ह्यू असेल."
काळी जादू करायची कंगना...
- अध्ययनने सांगितले, "कंगना मला पल्लवी नावाच्या एका तांत्रिकाकडे घेऊन गेली होती. तिने मला सांगितले, की हा काळ माझ्यासाठी चांगला नाही. एक पूजा करावी लागले."
- "या गोष्टींवर माझा विश्वास नव्हता. मात्र कंगनाने खूप भर दिल्यानंतर मी होकार दिला. एका रात्री तिने मला तिच्या घरी बोलावले. रात्री बारा वाजता पूजेला सुरुवात झाली."
- "कंगनाच्या अपार्टमेंटमध्ये एक गेस्ट रुम होती. त्या खोलीला काळ्या कापडांनी झाकण्यात आले होते. देवाच्या अनेक मुर्ती ठेवण्यात आल्या होत्या. सर्व काही भयावह होते. तिने मला काही मंत्र म्हणायला सांगितले आणि बाहेरुन दाराची कडी लावून टाकली. मी खूप घाबरलो होतो."
- "मी काहीच केले नाही. थोड्या वेळाने बाहेर येऊन मी मंत्र म्हटल्याचे तिला खोटे सांगितले. एकेदिवशी पल्लवीने मला रात्री बारा वाजता स्मशानात जाऊन काही वस्तू तेथे टाकण्यास सांगितल्या. हे ऐकून माझा थरकाप उडाला. मी तिचे म्हणणे ऐकले नाही."
तू काळ्या जादूविषयी बोलतोय?
- अध्ययन म्हणाला, "होय. मी एक महानगरातील मुलगा आहे, ज्याचे शिक्षण लंडन, न्यूयॉर्क याठिकाणी झाले. ज्योतिषी आणि काळ्या जादूपासून मी नेहमी लांब राहिण्याचा प्रयत्न केला आहे."
- "मी एका टॅरो रिडरकडे गेलो होतो, तेव्हा त्याने मला सांगितले, की त्याला माझ्यावर एका पहाडी भागातील काळ्या जादूचा प्रभाव वाटतोय. तेव्हाच माझ्या लक्षात आले होते, की माझी गर्लफ्रेंड हिमाचल प्रदेशातील आहे."
- "ती नेहमी पूजेच्या निमित्ताने तेथे जात असे. टॅरो रिडरने मला चेतावनी दिली होती, की खूप वाईट घडणारेय. या नात्यातून लवकरात लवकर बाहेर पड."
पुढे वाचा, अध्ययनला पहिला मोठा धक्का कधी बसला?
- सँडलने केली होती कंगनाने अध्ययनला मारहाण...
- आईबहिणीवरुन केली होती कंगनाने अध्ययनला शिवीगाळ...
- कशी झाली होती कंगना-अध्ययनच्या प्रेमप्रकरणाला सुरुवात
- कसे झाले दोघांचे ब्रेकअप.... आणि बरंच काही