आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

माजी विश्वसुंदरी डायना हेडन 8 वर्षांच्या फ्रोजन एगने झाली आई

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- माजी विश्वसुंदरी डायना हेडन आई झाली आहे. एका इंग्रजी वेबसाइटच्या रिपोर्टनुसार, शनिवारी (9 जानेवारी) डायनाने एका गोंडस मुलीला जन्म दिला आहे. डायना आई झाली ही आनंदाची बातमी तर आहेच, मात्र ती तब्बल 8 वर्षांपूर्वी गर्भवती होती, हे विशेष. झाले असे, की 42 वर्षीय डायना 8 वर्षांपूर्वी गर्भवती होती, त्यावेळी तिने अंडाशयातून बेबी एग्ज (अंड) काढून फ्रोजन करून ठेवले होते.
ही गोष्ट 2005ची आहे. ऑक्टोबर 2007पासून मार्च 2008दरम्यान डायनाने विशेषज्ञ डॉ. नंदिता यांच्या मदतीने 16 अंड्यांना फ्रोज केले. आठ वर्षांनंतर त्या फ्रोजन एग्जच्या माध्यमातून तिने एका चिमुकलीला जन्म दिला. या विज्ञानाचा चमत्कार म्हटले जात आहे. डायनाने एका वेबसाइटला सांगितले, की तिने दोन कारणांमुळे एग फ्रोज केले. पहिले म्हणजे, त्यावेळी मी माझ्या करिअरमध्ये बिझी होते. दुसरे म्हणजे, मला प्रेमाची प्रतिक्षा होती आणि बाळ झाल्यानंतर लग्न करायचे होते.
डायनाने या चिमुकलीचे नाव आर्या हेडन ठेवले आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून वाचा, काय आहे एग फ्रिजिंग टेक्निक...?
बातम्या आणखी आहेत...