आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शूटिंगच्‍या वेळी सेटवर पैसे वाटायचा जॅकी चॅन, सोनू सूदने सांगितली कहाणी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- जॅकी चॅनचा 'कुंग फू योगा' सिनेमा नूकताच रिलीज झाला आहे. सिनेमात हॉलिवूडचा सुपरस्‍टार जॅकी चॅनशी सोनू सूद टक्‍कर देत आहे. सोनूने सिनेमात मुख्‍य व्हिलनची भूमिका साकारली आहे. सिनेमाच्‍या प्रमोशनसाठी सोनू सूद नूकताच dainikbhaskar.comच्‍या कार्यालयात येऊन गेला. यावेळी त्‍याने जॅकी चॅनसोबतचा अनूभव शेअर केला. 
 
सेटवर पैसे वाटायचा जॅकी चॅन 
- सोनू सूदने सांगितले की, 'मी जॅकी चॅनचा खूप मोठा फॅन आहे. त्‍याच्‍याकडून खूप काही शिकायला मिळाले.'
- यावेळी सोनू म्‍हणाला, 'जॅकी चॅन खूप मनमोकळा कलाकार असून सेटवर आल्‍यावर सर्वात आधी तो स्टाफ आणि क्रु मेंबर्सना आपल्‍या हाताने काहीतरी खाऊ घालायचा आणि नंतरच शूटिंगला सुरवात करायचा.' 
- सोनूने सांगितले की,' जॅकी प्रत्‍येक आठ्वडयात स्टाफ आणि क्रु मेंबर्ससाठी काहीना काही स्‍पर्धा ठेवत असे. यामध्‍ये जास्‍तकरुन लॉटरीचा समावेश होता. आठ्वडयातील एक दिवस जॅकी दोन ते अडीच लाखांपर्यंतची लॉटरी जिंकण्‍याची संधी आपल्‍या क्रु मेंबर्सना द्यायचा. यावेळी तो स्वत: आपल्‍या हाताने लॉटरी जिंकलेल्‍यांना पैसे देत असे.' 
 
पुढील स्‍लाइडवर वाचा, बिजींगमध्‍ये शूटिंगव्‍यतिरिक्‍त काय काय करायचा सोनू सूद...
 
बातम्या आणखी आहेत...