आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

30 कोटीत बनला 'तनू वेड्स मनू रिटर्न्स', दिग्दर्शक आनंदची होणार हॅटट्रीक

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
('तनू वेड्स मनू रिटर्न्स'च्या एका सीनमध्ये कंगना रनोट आणि आर. माधवन)
या आठवड्यात इरोज इंटरनॅशनल आणि दिग्दर्शक आनंद राय यांचा 'तनू वेड्स मनू रिटर्न्स' हा सिनेमा रिलीज झाला आहे. सिनेमाच्या निर्मितीचा खर्च 30 कोटींच्या घरात असून जगभरातील प्रिंट आणि प्रचारासहित एकुण खर्च 40 कोटींच्या घरात आहे. कंगना रनोट आणि आर. माधवन यांच्याव्यतिरिक्त आनंद राय यांचे दिग्दर्शन या सिनेमाचे मोठे आकर्षण आहे. यापूर्वी त्यांनी तनू वेड्स मनू आणि रांझणा हे हिट सिनेमे दिले आहेत. आता या सिनेमाचा प्रोमो बघता ते यशाची हॅटट्रीक करतील असेच दिसतंय.
आनंद राय यांच्या हृदयस्पर्शी सिनेमांच्या कथेचे केंद्रबिंदू भारतातील एखादे छोटे शहर असते. दोन दशकांपूर्वी भारतीय सिनेमांचा परदेशातील व्यवसाय वाढला आणि डॉलरची कमाई करण्यासाठी आपल्या येथील निर्माते दिग्दर्शक सिनेमांच्या कथेत उगाचच परदेश किंवा मोठ्या शहरांना केंद्रित करु लागले होते. या कालखंडात भारतीय सिनेमा भारतातूनच गायब झाला. आनंद राय यांचे सिनेमे त्याच्या बॅकग्राउंडमुळे इतर सिनेमांपेक्षा वेगळे ठरतात. त्यांच्या सिनेमांच्या यशात लेखक हिमांशू शर्मा यांचेही मोठे योगदान आहे. कंगनासुद्धा यशोशिखरावर आहे. एखादा सिनेमा हिट होण्यासाठी कलाकारांचा उत्कृष्ट अभिनय महत्त्वाचा असतो.
गेल्या आठवड्यात रिलीज झालेला 'बॉम्बे वेलवेट' हा सिनेमा भारतीय सिनेसृष्टीतल सर्वात अपयशी सिनेमा ठरला. मोठे तारे-तारका असूनदेखील सिनेमाचा पहिल्या दिवसाचा व्यवसाय केवळ 5.30 कोटी इतकाच झाला. तर आठवड्याभराचा व्यवसाय केवळ 25 कोटी राहिला. सिनेमाकडे प्रेक्षकांनी फिरवलेली पाठ हे सिद्ध करते, की दिग्दर्शक अनुराग कश्यप यांनी सिनेमा बनवताना एखादी मोठी चुक केली. अनुराग कश्यप यांची मोठी अडचण म्हणजे आपल्या सिनेमाच्या अपयशाचे खापर ते प्रेक्षकांवर फोडत असतात. जर ते आपली चुकच मान्य करणार नसेल, तर सुधारणा तरी कशी करतील.
ग्रेट शो मॅन राज कपूर यांचा 'मेरा नाम जोकर' हा सिनेमा अपयशी ठरला. विशेष म्हणजे त्यांनी सत्य स्वीकारुन प्रेक्षकांची बदलेली टेस्ट बघता 'बॉबी' सिनेमा बनवला. सूरज बडजात्या यांनी 'मैं प्रेम की दीवानी हूं' हा सिनेमा बनवून करण जोहर आणि आदित्य चोप्रा यांच्या पावलावर पाऊल ठेवण्याचा प्रयत्न केला. सिनेमा आपटल्यानंतर त्यांनी आपली चुक सुधारत 'विवाह' सारखा हिट सिनेमा बनवला. अनुराग कश्यप यांच्यासारख्या दिग्दर्शकांनी एक गोष्ट समजून घेणे गरजेचे आहे, ती म्हणजे सिनेमांसोबत आर्थिक बाजूसुद्धा अतिशय महत्त्वाची आहे. अनुराग कश्यप यांच्या अधिकाधिक सिनेमांमुळे निर्मात्यांना मोठे नुकसान सहन करावे लागले आहेत. आता बातमी आहे, की ते मुंबईत नव्हे तर पॅरिसमध्ये सिनेमा बनवणार आहेत.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा, 'बॉम्बे वेलवेट'चा आठवड्याभराचा व्यवसाय...