आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

झाशीच्या राणीवर आधारित आहे कंगनाचा 'मणिकर्णिका', वाचा राणी ल्क्ष्मीबाईबाबतचे Facts

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वीरांगणा झाशीची राणी लक्ष्मी बाई यांच्या जीवनावर आधारित 'मणिकर्णिका' हा चित्रपट पुढल्या वर्षी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. कंगना रनोट या चित्रपटात झाशीच्या राणीच्या भूमिकेत झळकणार आहे. गुरुवारीच या चित्रपटाचे पोस्टर वाराणसीत एका कार्यक्रमास प्रकाशित करण्यात आले. 
 
झाशीची राणी लक्ष्मीबाई बाबत असे अनेक फॅक्टस् आहेत जे लोकांना खरे वाटतात पण इतिहासकारांच्या मते ते पूर्णपणे खोटे आहेत. राणी लक्ष्मीबाईच्या स्मृतीदिनाच्या निमित्ताने आम्ही तुम्हाला त्यांच्याशी संबंधित अशीच काही महत्तवाची माहिती देणार आहोत.
 
लग्नाच्या वयाबाबतही बोलले गेले खोटे
- राणी लक्ष्मीबाईची जन्मतारीख 19 नोव्हेंबर 1835 मानली जाते. 
- इंग्रजांशी लढताना वयाच्या 23 व्या वर्षी त्यांना हौतात्म्य आले होते असे म्हटले जाते. 
- अनेक इतिहासकार याला सत्य मानत नाहीत. 
- 'झांसी क्रांति की काशी' पुस्तक लिहिणारे इतिहासकार ओमशंकर असर यांच्या मते 1835 मध्ये राणीचा जन्म झाल्याचा दावा चुकीचा आहे. झांशीचे राजा गंगाधर राव यांच्याशी झाशीच्या राणीचा विवाह 1842 मध्ये झाला होता. जर त्यांचा जन्म 1835 मध्ये झाला तर मग त्या विवाहावेळी केवळ 7 वर्षांच्या होत्या का? 
- राणीने लग्नापूर्वीच तलवारबाजी आणि घोडेस्वारी शिकली होती. एवढ्या कमी वयात ते शिकणे कठीण वाटते.
 
सत्य काय..
- ओमशंकर असर यांच्या मते, राणीचा जन्म 19 नोव्हेंबर 1827 ला झाला होता. 
- विवाहावेळी त्या 15 वर्षांच्या होत्या. 
- हौतात्म्य आले त्यावेळी त्यांचे वय जवळपास 31 वर्षे होते.
 
पुढील स्लाइड्सवर जाणून घ्या झाशीच्या राणीबाबतच असेच दावे आणि प्रतिदावे...
 
Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.

 
बातम्या आणखी आहेत...