आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अश्विनी एकबोटेंच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, अकाली निधनाने हळहळली मराठी सिनेसृष्टी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - प्रसिद्ध अभिनेत्री अश्विनी एकबोटे (४४) यांच्या पार्थिवावर पुण्यात अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत. पुण्यात कार्यक्रमादरम्यान हृदयविकाराच्या झटक्याने रंगमंचावरच त्यांचे निधन झाले होते. भरत नाट्यमंदिरात शनिवारी ‘नाट्यत्रिविधा’ या नाटकाचा प्रयोग सुरू होता, त्यावेळी ही दुःखद घटना घडली. अश्विनी यांच्या जाण्याने मराठी चित्रपटसृष्टीत हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
शेवटच्या प्रसंगात नृत्य करताना अश्विनी यांनी गिरकी घेतली तेव्हा त्या रंगमंचावर कोसळल्या.
हा नाटकातीलच भाग आहे, अशी समजूत उपस्थितांची झाली. त्यादरम्यानच पडदाही पडला,
मात्र अश्विनी जमिनीवर कोसळल्या. त्यांना रुग्णालयात दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी मृत घोषित केले .अश्विनी यांनी दूर्वा, राधा ही बावरी, असंभव, कशाला उद्याची बात अशा मालिकांतून अभिनयाची छाप उमटवली. सध्या अश्विनी या कलर्स वाहिनीवरील ‘गणपती बाप्पा मोरया’ यात रावणाच्या आईची भूमिका साकारत होत्या. त्यांनी अनेक मराठी चित्रपटांतही भूमिका साकारल्या. महागुरू, बावरे प्रेम हे, तप्तपदी, आरंभ, क्षण हा मोहाचा, आदी चित्रपटांतील त्यांच्या भूमिका विशेष गाजल्या.
अश्विनी यांनी केलेल्या टिव्ही सिरियल, चित्रपट, नाटकांची यादी पाहुयात, पुढील स्लाइड्सवर..
फोटो - अश्विनी एकबोटे यांच्या फेसबूक पेजवरून साभार...
बातम्या आणखी आहेत...