आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जामीनानंतर चाहत्यांनी केले सेलिब्रेशन, सलमानने दिल्या अशा REACTION

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(चाहत्यांसाठी सलमानचे दिली प्रतिक्रिया)
मुंबई- शुक्रवारी (8 मे) हायकोर्टाने सलमानच्या पाच वर्षांच्या शिक्षेवर स्थगिती दिली आहे. कोर्टाचा निकाल ऐकताच रस्त्यावर सलमानच्या चाहत्यांनी आनंद साजरा करण्यास सुरुवात केली. चाहत्यांनी मिठाई वाटून, फटाके फोडूला जल्लोष केल. एवढेच नव्हे सलमानच्या गॅलक्सी अपार्टमेंट बाहेर चाहत्यांनी गर्दी केली होती.
सलमान जेव्हा हायकोर्टातून घरी पोहोचला तेव्हा त्याने बाल्कनीमध्ये येऊन हात हालवून चाहत्यांचे अभिवादन स्वीकारले. यादरम्यान सलमानसोबत आई सलमा, वडील सलीम खान, बहीण अर्पिता खान शर्मा आणि भाऊ अरबाज खानसुध्दा बाल्कनीत उपस्थित होते. सलमानने टि्वटरच्या माध्यमातून चाहत्यांचे आभार मानले. त्याने पोस्ट केले, "All those who prayed for and supported me thank u meherbani shukriya ."
बुधवारी (6 मे) मुंबई सत्र न्यायालयाने 13 वर्षे जून्या हिट अँड रन प्रकरणात सलमानला दोषी ठरवून पाच वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली होती. यावर हायकोर्टाने अंतरिम जामीन देऊन त्याला दिलासा दिला. या प्रकरणारी सुनावणी 8 आता 15 जून रोजी होणार आहे. जर या प्रकरणात हायकोर्टने सलमानचा जामीन रद्द केला तर त्याला तुरुंगवास भोगावा लागेल.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा सलमानची प्रतिक्रिया आणि चाहत्यांना जल्लोष...