आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रार्थना सभेत शाहरुखच्या स्पॉट बॉयला गौरी, फराह खानने वाहिली श्रद्धांजली

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(दिवंगत सुभाष दादांना श्रद्धांजली वाहताना गौरी खान, फराह खान आणि इतर)
मुंबईः अभिनेता शाहरुख खानची पत्नी गौरी खान आणि दिग्दर्शिका फराह खान यांनी दिवंगत स्पॉट बॉय सुभाष दादांच्या प्रार्थना सभेला हजेरी लावून त्यांना श्रद्धांजली वाहिली. दोन दिवसांपूर्वी कॅन्सरमुळे सुभाष दादांचे निधन झाले. गेल्या 25 वर्षांपासून सुभाष दादा शाहरुख खानचे स्पॉट बॉय म्हणून काम करत होते.
शाहरुख सध्या आगामी 'दिलवाले' या सिनेमाच्या शूटिंगच्या निमित्ताने बुल्गेरिया येथे आहे. त्यामुळे तो त्यांच्या अंत्यविधी आणि प्रार्थना सभेला उपस्थित राहू शकला नाही. मात्र त्याची पत्नी गौरी खानने मुलगा आर्यनसोबत त्यांच्या अंत्यविधीली उपस्थिती लावून त्यांना अखेरचा निरोप दिला.
पुढे पाहा, सुभाष दादांना श्रद्धांजली वाहण्यासाठी पोहोचलेल्या लोकांची छायाचित्रे...