आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कपिलच्या अशा वागण्याने संतप्त झाली फराह खान, ट्विटरवर म्हटले मॅनरलेस

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - बॉलिवूड फिल्म डायरेक्टर आणि कोरिओग्राफर फराह खानने रागारागात एक ट्विट केले आहे. यामध्ये तिने कोणाचेही नाव न घेता 'मॅनरलेस' म्हणत हे ट्विट केले आहे. पोस्टमध्ये फराहने लिहिले, 'प्रिय मॅनरलेस व्यक्ती, तुम्हाला जर मला आपल्या फिल्मच्या प्रीमियर/प्रिव्ह्यू/पार्टी साठी बोलावण्याची इच्छा आहे तर मला व्हॉट्सअॅपवर 'जनता निमंत्रण' पाठवू नये. तुम्ही माझ्यावर उपकार करत नाही, तुम्ही मला किमान एक पर्सनल कॉल करु शकता. जर तुमच्याकडे तेवढाही वेळ नसेल तर तुम्ही असा कसा विचार करता की मी तुमच्याकडे येण्यासाठी तयार बसले आहे?'

 

फराहने कपिलसाठी केले ट्विट... 
- स्पॉटबॉयच्या वृत्तानुसार, फरा खानने कोणाचे नाव न घेता केलेले हे ट्विट कॉमेडियन आणि अॅक्टर कपिल शर्मासाठी केले आहे. 
- या वृत्तात म्हटल्यानुसार, फराह खानला जेव्हा ट्विटबद्दल विचारण्यात आले तेव्हा तिने, 'हे कपिलसाठी नव्हते. त्या दिवशी आणखी दोन-तीन इव्हेंट होते, मी त्या सर्वांना उद्देशून हे म्हटले आहे.' असा खुलासा केला. 
- कपिल शर्माची फिल्म फिरंगी नुकतीच रिलीज झाली आहे. त्याच्या स्क्रिनिंगसाठी कपिलने फराह खानला व्हॉट्सअॅप मॅसेज पाठवून निमंत्रित केले होते.

 

30 नोव्हेंबरला होती स्क्रिनिंग 
- कपिल शर्माची मुख्य भूमिका असलेल्या फिरंगीचे स्पेशल स्क्रिनिंग 30 नोव्हेंबरला होते. यासाठी बॉलिवूडचे अनेक बडे स्टार निमंत्रित होते. 
- मात्र, स्क्रिनिंगला फक्त हिमेश रेशमिया, पलक मुछाल, अब्बास-मस्तान, किकू शारदा, रवी दुबे आणि नोरा फतेहीसारखे काही सेलेब्स उपस्थित होते. 
- बॉलिवूडमधील एकही बडा स्टार कपिलच्या स्क्रिनिंगला उपस्थित नव्हता. 

 

पुढील स्लाइडमध्ये पाहा, फिरंगीच्या स्क्रिनिंगला कोण-कोण आले होते... 

बातम्या आणखी आहेत...