आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फरदीन खानने शेअर केला मुलाचा पहिला PHOTOS, 4 वर्षात दुसऱ्यांदा बनला पिता

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - बॉलिवूड अभिनेता फरदीन खान 11 ऑगस्ट रोजी दुसऱ्यांदा वडील बनला आहे. नुकताच त्याने त्याच्या मुलाचा आणि त्याचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. ज्यात तो त्याच्या मुलाला कडेवर घेताना दिसत आहे. फरदीने मुलाचे नाव  Azarius Fardeen Khan असे ठेवले आहे. फरदीन आणि त्याची पत्नी नताशाचे हे दुसरे बाळ आहे. याअगोदर नताशाने 2013 साली मुलगी इसाबेलला जन्म दिला होता. 16 वर्षाअगोदर केले होतो लग्न..
 
 फरदीन खान अभिनेता फिरोज खान यांचा मुलगा आहे. फरदीनने अभिनेत्री मुमताजची मुलगी नताशासोबत डिसेंबर 2005 साली विवाह केला होता. त्याने 1998 साली 'प्रेम अगन' या चित्रपटातून बॉलिवूड करिअरची सुरुवात केली होती.
 
फरदीनला खरी ओळख राम गोपाल वर्मा यांच्या जंगल चित्रपटातून मिळाली. यानंतर त्याने 'प्यार तूने क्या किया', 'हे बेबी', 'नो एंट्री', 'ओम जय जगदीश', 'खुशी', 'फिदा' आणि 'दूल्हा मिल गया' या चित्रपटात काम केले होते. 
 
 पुढच्या 5 स्लाईडवर पाहा, फरदीन खानच्या फॅमिलीचे काही खास PHOTOS...
बातम्या आणखी आहेत...