आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Bangla Kurtas, Dhakai Sarees, Babu Shoes: Fashion Of 1940s Revisited In Detective Byomkesh Bakshy

मोठ्या पडद्यावर 1940च्या दशकातील फॅशन दाखवणार 'डिटेक्टिव ब्योमकेश बक्शी'

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(सुशांत सिंह राजपूत)
मुंबईः अभिनेता सुशांत सिंह राजपूत 'काय पो छे', 'शुद्ध देसी रोमान्स' आणि 'पीके' या सिनेमांमध्ये आजच्या काळातील लूकमध्ये दिसला होता. मात्र आगामी 'डिटेक्टिव ब्योमकेश बक्शी' या सिनेमात सुशांत 1940 च्या दशकातील फॅशनमध्ये मोठ्या पडद्यावर अवतरणार आहे. सिनेमात दुस-या महायुद्धाचा काळ दाखवण्यात आला आहे. त्यामुळे सिनेमात इंडियन आणि अमेरिकन संस्कृतीचे दर्शन प्रेक्षकांना घडेल.
जीआय कॅनव्हास यूएस मिलिट्री शूजपासून ते बर्माचे दागिने, बंगाली कुर्ते, गांधी स्टाइलची घडी आणि स्वातंत्र्यापूर्वी कोलकातामध्ये वापरात असलेले वेगवेगळे फॅशन एलिमेंट्सदेखील सिनेमात बघायला मिळतील. सिनेमाचे कॉश्च्युम्स रुशी शर्मा यांनी मनोशी नाश यांनी मिळून डिझाइन केले आहेत. या प्रोजेक्टसाठी दोघांनी भरपूर रिसर्च केला होता. रुशी यांनी सांगितले, "हे एक खूप अवघड काम होते. केवळ पाच महिन्यांत आम्ही हे काम पूर्ण केले याचा आम्हाला आनंद आहे. रिसर्चसाठी खूप वेळ लागला. इंटरनेटवर उपलब्ध असलेल्या जुन्या मॅगझिनच्या मदतीने कॉश्च्युम डिझाइन करण्यात आले आहेत."
'क्वीन' आणि 'पीके' या सिनेमांसाठी कॉश्च्युम डिझायनर म्हणून काम केलेल्या रुशी आणि मनोशी यांनी divyamarathi.comसोबत बातचित करताना 'डिटेक्टिव ब्योमकेश बक्शी' या सिनेमाच्या वेशभूषेशी निगडीत रंजक गोष्टी शेअर केल्या.
बंगाली कुर्ते
1940 च्या दशकाच्या पार्श्वभूमीवर सिनेमा बेतला असल्याने सुशांत सिंह राजपूत बंगाली कुर्त्यात दिसला आहे. मोनाशी यांनी सांगितले, हे कुर्ते अगदी साध्या शर्टप्रमाणे दिसतील. याला कफ आणि कॉलरदेखील असेल. बंगाली कुर्ता कॉटनपासून बनला आहे. या कुर्त्याला मोठे पॉकेट्स असून त्यामध्ये बरेच साहित्य ठेवता येऊ शकते.
पुढे वाचा, 'डिटेक्टिव ब्योमकेश बक्शी' या सिनेमातील कॉश्च्युमशी निगडीत रंजक गोष्टी..