आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सलीम खान म्हणाले, मुस्लिम असल्याने माझा मुलगा सलमान झाला टार्गेट

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- बॉलिवूड अभिनेता सलमान खानचे वडील सलीम खान यांनी एका टीव्ही चॅनलला दिलेल्या एका मुलाखतीत सांगितले, की त्यांचा मुलगा मुस्लिम आणि सेलिब्रिटी असल्याने त्याच्यावर निशाणा साधला. प्रसिध्द फिल्म स्क्रिप्टराइटर सलीम यांनी सांगितले, की भाजपचा स्थानिक नेता आशिष शेलारने त्यांना धमकी दिली, की जेव्हा कधी सलमान भेटेल तेव्हा त्याला मारणार आहेत. सलमानने 1993च्या मुंबई बॉम्बस्फोटातील गुन्हागार याकूब मेमनला फाशी देण्याचा टि्वटरवरून विरोध केला होता. त्यानंतर शिवसेना आणि भाजपसारख्या पक्षांनी सलमानच्या घराबाहेर विरोध दर्शवण्यासाठी मोर्चा काढला होता. याकूबला 30 जुलै रोजी नागपूरच्या सेंट्रल जेलमध्ये फाशी देण्यात आली.
आपल्या मुलाच्या टि्वट सांगितले अर्थहीन-
सलीम खान यांनी एक पुन्हा एकदा याकूब मेमनविषयी सलमानने केलेल्या टि्वटला अर्थहीन सांगितले आहे. सलमानने याकूब मेमनविषयी 14 टि्वट केले होते. त्यानंतर सलमानवर तिव्र टिका झाली होती.
'धार्मिक नाहीये पंतप्रधान'
पंतप्रधान नरेंद्र मोदीविषयी सलीम खान म्हणतात, 'मी एका पोलिसवाल्याचा मुलगा आहे. मला माहित आहे, एखादी व्यक्ती बाहेरून आणि आतून कशी असते. मोदी धार्मिक नाहीये. दंगलींविषयी सांगायचे झाले तर दंगल कुणीच नियंत्रणात आणू शकत नाही. दंगलींमध्ये आर्मीलासुध्दा बोलवावे लागते.'
'धर्माचा दहशतीशी काहीही संबंध नाही'
जावेद अख्तरसोबत 'शोले' आणि 'दीवार'सारखे सुपरहिट सिनेमांची पटकथा लिहणारे सलीम खान म्हणतात, 'धर्माचा दहशतीशी काहीच संबंध नाहीये. मुस्लिंमांना सांगावे, की खरा इस्लाम काय आहे.'
बातम्या आणखी आहेत...