आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फतवा : मोहम्मद साहेबांवर आधारित सिनेमाला संगीत देऊन नापाक झाले ए.आर. रेहमान

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबईः प्रसिद्ध संगीतकार ए. आर. रेहमान आणि इराणी सिनेनिर्माते माजिद मजिदी यांच्याविरोधात मुंबईतील सुन्नी मुस्लीम गटाने फतवा काढला आहे. या दोघांच्या प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्यावर आधारित 'मोहम्मद - द मॅसेंजर ऑफ गॉड' या सिनेमावर बंदी टाकावी अशी मागणी या गटाने काढला आहे.
काय लिहिले आहे फतव्यात?
इराणमधील सिनेनिर्माते माजिद मजिदी यांनी 'मोहम्मद - द मॅसेंजर ऑफ गॉड' हा सिनेमा तयार केला असून या सिनेमाला ए. आर. रेहमान यांनी संगीत दिले आहे. मात्र यावर मुंबईतील रझा अॅकेडमीने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. सिनेमा तयार करणारे दिग्दर्शक आणि सिनेमाशी संबंधित व्यक्तींनी इस्लाम धर्माचा अनादर केल्याचे त्यांनी म्हटले आहे. सिनेमाशी संबंधीत मुस्लिम व्यक्ती विशेषतः मजिदी आणि रेहमान यांनी इस्लाम धर्म अपवित्र केला आहे, आता त्यांनी पुन्हा कलमा वाचावा असा फतवा काढण्यात आला आहे. रेहमानने या वृत्तावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.
कुणी आणि कसा बनवला सिनेमा?
  • 'मोहम्मद - द मॅसेंजर ऑफ गॉड' हा सिनेमा 27 ऑगस्टला रिलीज झाला आहे. सिनेमाचे दिग्दर्शक हे ऑस्कर विजेते माजिद मजीदी आहेत.
  • सिनेमाचा एकुण खर्च 253 कोटी (40 मिलियन USD) इतका आहे. हा इराणमधील आत्तापर्यंतचा सर्वात महागडा सिनेमा असल्याचे म्हटले जात आहे.
  • इराणचे मॅगझिन हिजबुल्लाह लाइनशी बोलताना माजिद म्हणाले, "मी वेस्टर्न देशांतील इस्लामविषयी वाढत चालेल्या भीतीमुळेच हा सिनेमा बनवण्याचा निर्णय घेतला."
  • सिनेमा तीन भागांत बनला आहे. पहिला भाग 117 मिनिटांचा आहे. यामध्ये पैगंबर साहेबांच्या बालपणीची कहाणी दाखवण्यात आली आहे. यामध्ये त्यांची भूमिका साकारणा-या अभिनेत्याचा चेहरा दाखवण्यात आलेला नाही. केवळ त्याची सावली दाखवण्यात आली आहे.
  • सिनेमाच्या रिलीजनंतर अरब देशांमध्ये खळबळ उडाली आहे. सुन्नीची मोठी संघटना असलेली अल-अजहर या सिनेमावर नाराज आहे.