आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Ferrari Ki Sawaari Director Rajesh Arrested For Domestic Abuse

‘फरारी की सवारी’च्या दिग्दर्शकाला अटक, पत्नीने लावला कौंटुबीक हिंसेचा आरोप

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
‘फरारी की सवारी’चा दिग्दर्शक राजेश मपुस्करवर त्याची पत्नी निशाने कौटुंबीक हिंसा केल्याचा आरोप लावला आहे. निशाने भारतीय पॅनल कोडच्या कलम 465, 468, 471 आणि कौंटुबिक हिंसा (आयपीसी कलम 498) अंतर्गत तक्रार दाखल केली आहे. मंगळवारी (2 नोव्हेंबर) रात्री 11 वाजता डिंडोशी पोलिसांनी (मुंबई) राजेशला अटक केली.
एका वर्तमानपत्रात दिलेल्या मुलाखतीत, निशाने सांगितले, 'राजेश दरमहिन्याला ओबेरॉय वुड्समध्ये असलेल्या फ्लॅटचे 65,000 रुपये देत होता, परंतु मी माझ्या मुलांसह गोरेगावच्या ज्या फ्लॅटमध्ये राहत होते, त्याचे पैसे देण्यासाठी राजेशकडे पैसे नव्हते.' इतकेच नव्हे तर त्याने निशावर आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोपसुध्दा लावला. त्यानंतर तिला बळजबरीने तीन महिने मेंटल हॉस्पिटलमध्ये ठेवण्यात आले होते.
निशाने पुढे सांगितले, की राजेशचे अनिल नायडूची पत्नी महिप ढिल्लनसोबत विवाहबाह्य संबंध आहे. अनिल 'फरारी की सवारी' सिनेमात राजेशचा असिस्टंट होता.
निशा सध्या घटस्फोटाचा खटला लढत आहेत आणि मुलांच्या कस्टडीसाठी कोर्टाकडे मागणी करत आहे. कारण मुलांना वडिलांकडे राहायचे नाहीये. तिने असेही सांगितले, की ती एका चांगल्या कुटंबातून आहे, परंतु राजेशसाठी ती चाळीत राहण्याससुध्दा तयार झाली. राजेशच्या कमी पगारातसुध्दा तिने दिवस काढले, मात्र राजेशने तिचा विश्वासघात केला.
दिग्दर्शक बनवण्यापूर्वी राजेशने दिग्दर्शक राजकुमार हिराणी यांना 'मुन्नाभाई' सीरिज आणि '3 इडियट्स'सारख्या सिनेमांसाठी अस्टिट केले आहे.