आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रिलीज झाले रणबीर, अनुष्का अभिनीत 'बॉम्बे वेलवेट'चे गाणे, पाहा VIDEO

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- बॉलिवूड स्टार रणबीर कपूर आणि अनुष्का शर्मा यांचा 'बॉम्बे वेलवेट' या आगामी सिनेमाचे पहिले गाणे 'फीफी' रिलीज झाले आहे. हे गाणे तुम्हाला 60च्या दशकाची आठवण करू देणारे आहे. सोबतच हे गाणे पाहून तुमचे पाय आपोआप थिरकायला लागतील.
रणबीर, अनुष्काचे हे गाणे 1956मध्ये रिलीज झालेल्या देवानंद आणि वहीदा रहमान यांच्या 'सीआयडी' सिनेमातील 'जाता कहा है दिवाने' गाण्याचा रिमेक आहे. याच्या मूळ गाण्याला गीता दत्त यांनी आवाज दिला होता. गीताच्या नवीन रुपात अनुष्का आणि केके मेनन दिसणार आहेत.
गाण्यात अनुष्का 60च्या दशकाच्या लूकमध्ये दिसली. यात ती अगदीच ग्लॅमरस दिसून आली. तिला जॅज सिंगरच्या रुपात दाखवले आहे आणि ती गाणे गात आहे. एकीककडे अनुष्काची बॉडी लँग्वेज उत्साहपूर्ण दिसत असून रणबीर नॅचरल अग्रेशनमध्ये आहे. हा सिनेमा येत्या 15 मे रोजी थिएटरमध्ये दाखल होत आहे.
गाण्याविषयी दिग्दर्शक अनुराग कश्यपने सांगितले, 'हे गाणे मला सुरुवातीपासूनच आवडते. दुर्दैव आहे, की हे गाणे मूळ रुपात सिनेमात दाखवू शकत नाही. कारण सेन्सॉर बोर्डाने याला सिनेमातून काढून टाकण्याचे आदेश दिले आहेत. म्हणून आम्ही केवळ गाण्याचे बोल यात वापरणार आहोत.'
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा या गाण्यातील काही सीन्स...