आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चित्रपटात अभिनय करते ही ट्रांसजेंडर, आता काम मिळवण्यासाठी मागतेय मदत

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गुजरात - शहरातील ट्रांसजेंडर आणि अभिनेत्री आएशा शेख ब्युटी पिजेंटमध्ये गुजरातचे प्रतिनीधीत्व करत आहे. आता आएशा या स्पर्धेच्या लास्ट राऊंडला पोहोचली आहे. पण लास्ट राऊंडसाठी लागणारी फिस, कपडे आणि मेकअपचे सामान नसल्याने तिने सरकारकडे 25 हजार रुपयांची मदत मागितली आहे. सेक्स चेंजचे ऑपरेशनही आहे बाकी..
 
- आएशाने सांगितले की, तिला मिस ट्रांस क्वीन इंडिया बनायचे आहे. त्यासाठी ती गेल्या 6 वर्षापासून लक्ष्य संस्थेच्या एका प्रोजेक्टमध्ये  काम करत आहे. त्यासाठी ती पैसेही जमा करत आहे. 
- याशिवाय तिचे एक सेक्स चेंजचे ऑपरेशनही बाकी आहे. ऑपरेशन केल्यानंतर ती पूर्णपणे स्त्री बनणार आहे.
- लक्ष्य संस्थेपासूनच तिचा उदरनिर्वाह चालतो. बीएससीचे शिक्षण पूर्ण करुनही तिला कोणीच नोकरी देत नाही.
- स्पर्धेचा शेवटचा राऊंड या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात होणार आहे. ज्यात ती ब्युटी कॉम्पीटीशऩद्वारे नॅशनल लेव्हलवर जगाला रिप्रेझेंट करणार आहे.

टीव्ही सिरीअल्स आणि भोजपुरी चित्रपटात केले आहे काम..
- आएशा शेख टीव्ही सिरीअल्स आणि भोजपुरी चित्रपटात काम करत आहे. तिने सांगितले की तिला किन्नर समजून तिच्या घरच्यांनी सोडून दिले होते. पण ती किन्नर नाही.
-  आएशाने सांगितले की, लहानपणी तिच्यात मुलींचे लक्षण होते पण फॅमिलीने लक्ष दिले नाही. त्यांनी किन्नर म्हणून मला सोडून दिले. 
- 2012 साली  आएशा वडोदराला आली आणि लक्ष्य ट्रस्टशी जुळली. आएशाने डिप्लोमा इन सर्विस मैनेजमेंटची डिग्री घेतली आहे.
-  आएशाने सांगितले की, शाळा-कॉलेजात असताना सर्वचजण थट्टा करत असत. पण मी कधीच हार मानली नाही. 
- तिने ठरविले होते की भविष्यात ट्रांसजेंडर म्हणूनच नाव कमावणार आहे. 
- आएशाने सांगितले की, मुंबईमध्ये असलेल्या ट्रांस इंडिया क्वीनमध्ये भारतातील 30 ट्रांसजेंडर हिस्सा घेत आहेत. 
 
पुढच्या स्लाईडवर पाहा, आएशाचे काही PHOTOS...
बातम्या आणखी आहेत...