आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

6 वर्षे लिव्ह इन मध्ये राहिल्यानंतर या कारणामुळे तुटले सुशांत-अंकिताचे नाते

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबईः सुशांत सिंह राजपूत स्टारर 'एम एस धोनी: द अनफोल्ड स्टोरी' हा सिनेमा 30 सप्टेंबर रोजी रिलीज होतोय. या सिनेमाच्या प्रमोशनमध्ये बिझी असलेल्या सुशांतने अलीकडेच चित्रपट समीक्षक अनुपमा चोप्रांसोबत खास बातचित केली. यावेळी सुशांतने आपल्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्याविषयी ब-याच गप्पा मारल्या. या कारणामुळे झाले ब्रेकअप...

सुशांत आणि त्याची गर्लफ्रेंड आणि अभिनेत्री अंकिता लोखंडे यांच्या ब्रेकअपची बरीच चर्चा झाली होती. पवित्र रिश्ता या मालिकेच्या सेटवर दोघांचे सूत जुळले होते. सहा वर्षे लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर याचवर्षी या जोडीचे ब्रेकअप झाले. हे नाते तुटण्याचे खरे कारण सांगताना सुशांत म्हणाला, "रिलेशनशिप टिकवून ठेवण्यासाठी वेळ खूप गरजेचा आहे. जर तुम्ही अपेक्षा ठेवल्या नाहीत, तर नाते टिकून राहते. तुम्ही प्रेमात असताना दुस-याविषयी विचार करता. त्याच्यासोबत चांगल्या आठवणी जुळवण्यासोबतच त्याला आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करता. त्यामुळे रिलेशनशिपमध्ये वेळ ही एक गुंतवणूक असते. आपण त्या सायकॉलॉजिकल सिक्युरिटीच्या मागे धावतो, जी कायम आपल्यासोबत नसते. अॅक्टर स्वतःविषयीच बोलू इच्छितो. सगळे सेल्फ ओब्सेस्सेड असतात. कलाकाराची इच्छा असते, की समोरच्याने केवळ त्याचे ऐकावे. मात्र सध्या लोकांची लिसनिंग स्किल्स बिघडली आहे. ते ऐकतात मात्र समजूत घेत नाहीत."

पुढील स्लाईड्सवर क्लिक करुन वाचा, आणखी काय म्हणाला, सुशांत सिंह राजपूत...
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...