Home »News» Film Dhadak Shooting In Udaipur

ईशान खट्टरला केली पोलिसांनी अटक, राजस्थानात सुरु आहे 'धडक'ची शुटिंग

दिव्य मराठी वेब टीम | Dec 07, 2017, 00:09 AM IST

  • धडकच्या शूटिंगवेळी ईशान - जान्हवी.

मुंबई/उदयपूर - 'सैराट'चा हिंदी रिमेक 'धडक'ची गेल्या काही दिवसांपासून राजस्थानमध्ये शूटिंग सुरु आहे. फिल्मची लीड अॅक्ट्रेस जान्हवी कपूर आणि अॅक्टर ईशान खट्टर यांच्यातील केमिस्ट्री दिवसेंदिवस समोर येत आहे. जान्हवी कपूर श्रीदेवीची मुलगी असून या फिल्ममधून ती बॉलिवूडमध्ये डेब्यू करत आहे. तर ईशान अॅक्टर शाहिद कपूरचा भाऊ आहे. ईशानला पोलिसांनी अटक करण्याचा सीन नुकताच येथे शूट झाला आहे. हे शूटिंग पाहाण्यासाठी स्थानिकांनी गर्दी केली होती.

'धडक'ची टीम काही दिवसांपूर्वीच राजस्थानमधील मेनार येथे पोहचली होती. प्रोड्यूसर करण जोहरही शूटिंग सुरु असलेल्या गावात पोहोचला होता. करणच्या उपस्थितीत ब्रहम सागर येथील 52 फूट उंच शिव प्रतिमेचे पूजन झाले. त्यानंतर शूटिंग सुरु करण्यात आले होते.

बॉलिवूड अॅक्टर आणि अॅक्ट्रेस शहरात असल्याने त्यांच्या सुरक्षेसाठी मोठा पोलिस फौजफाटा शूटिंगच्या गावात तैनात आहे. श्रीदेवी देखील मुलीसोबत आहे.

हा सीन झाला शूट...
- मेनार येथे विविध ठिकाणी फिल्मचे शूटिंग सुरु आहे. ईशानला पोलिसांनी अटक करण्याचा सीन नुकताच शूट झाला आहे.

6 जुलै ला रिलीज होणार
- धर्मा प्रोडक्शनच्या इंस्टाग्राम पेजवर मुहूर्ताचे फोटो टाकण्यात आले आहे. त्यासोबतच शशांक खेतानच्या दिग्दर्शनात तयार होत असलेली फिल्म 'धडक' पुढील वर्षी 6 जुलैला रिलीज होणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे.

पुढील स्लाइडमध्ये पाहा, ऑन लोकेशनचे काही फोटो...

Next Article

Recommended