आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Film Don Completed 37 Years Of Its Release On Tuesday

\'डॉन\'च्या रिलीजला 37 वर्षे पूर्ण, बिग बींनी चाहत्यांसोबत शेअर केल्या आठवणी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
('डॉन'च्या सेटवर अमिताभ बच्चन आणि दिग्दर्शक चंद्रा बरोट)
मुंबईः बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांचा 'डॉन' हा सिनेमा तुम्ही बघितला असेलच. या सिनेमातील डायलॉग्स लोकांच्या ओठी आजही रेंगाळत आहेत. या सिनेमातील “डॉन को पकड़ना मुश्किल ही नहीं नामुमकिन है।” हा संवाद आजही तेवढाच प्रसिद्ध आहे. 'डॉन'चा उल्लेख करण्याचे विशेष कारण म्हणजे या सिनेमाला रिलीज होऊन तब्बल 37 वर्षे पूर्ण झाली आहेत. 37 वर्षांपूर्वी 21 एप्रिल रोजी हा सिनेमा थिएटरमध्ये दाखल झाला होता. सिनेमाच्या या प्रवासाला उजाळा देताना बिग बींनी सिनेमाशी निगडीत काही इंट्रेस्टिंग गोष्टी आपल्या चाहत्यांसोबत शेअर केल्या आहेत.
अमिताभ बच्चन यांनी आपल्या ब्लॉगवर लिहिले, "डॉन आज (मंगळवार) 37 वर्षांचा झाला. एक जेंटल सिनेमॅटोग्राफर नरिमन इरानी यांनी तयार केलेला सिनेमा."
तर ट्विटरवर बिग बी म्हणाले, " आज डॉन 37 वर्षांचा झाला. असामान्य! एक प्रवास जो आजही सुरु आहे."
अॅक्शन सीन करताना बिग बींच्या पायाला झाली होती दुखापत
अमिताभ बच्चन यांनी या सिनेमातील 'खईके पान बनारस वाला...' या गाण्याशी निगडीत काही आठवणी शेअर केल्या. बिग बींनी लिहिले, "अॅक्शन सीन करताना माझ्या पायाला दुखापत झाली होती. तळपायाला मोठे फोड झाले होते. त्यामुळे मी बूट घालू शकत नव्हतो. शिवाय चालतानाही त्रास व्हायचा. हे गाणे अनवाणी पायाने शूट करायचे होते. त्यावेळी प्रत्येक शॉटपूर्वी मी पेन किलर खाल्ले आणि गाणे पूर्ण केले."
चंद्रा बरोट दिग्दर्शिक अॅक्शन थ्रीलर हा सिनेमा 1978 मध्ये रिलीज झाला होता. सिनेमात बिग बींसह झीनत अमान, प्राण, इफ्तेखार यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका होत्या. सलीम-जावेद यांनी या सिनेमाची पटकथा लिहिली होती, तर कल्याणजी-आनंदजी यांचे संगीत होते. सिनेमात बिग बींनी दुहेरी भूमिका साकारली होती.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा, 'डॉन' सिनेमाशी निगडीत खास छायाचित्रे...