आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Film Farji Might Get Delay Due To Shahid Kapoor's Wedding

शाहिद जूनमध्ये चढणार बोहल्यावर, लांबणार 'फर्जी'चे शूटिंग

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अभिनेता शाहिद कपूर यावर्षी लग्नगाठीत अडकणार असल्याची बातमी यापूर्वीच आम्ही तुम्हाला दिलेली आहे. खरं तर वर्षाच्या शेवटी म्हणजे डिसेंबर महिन्यात शाहिद आणि दिल्लीची मीरा राजपूत लग्नगाठीत अडकणार असल्याची बातमी होती. मात्र शाहिदने डिसेंबर नव्हे तर जूनमध्ये विवाहबद्ध होण्याचा निर्णय घेतला आहे. याची माहिती 'फर्जी' या सिनेमाचे दिग्दर्शक राज निदिमोरु आणि कृष्णा डीके यांनी दिली आहे.
जूनमध्ये 'फर्जी'चे शूटिंग सुरु करणे अशक्य असल्याचे शाहिदने त्यांना सांगितले आहे. लग्नाची तयारी करायची असल्याने सिनेमाचे शूटिंग लांबणीवर टाका, असे शाहिदने राज आणि कृष्णा यांना सांगितले.
याविषयी राज निदिमोरु यांनी सांगितले, "फर्जीचे शूटिंग आता निश्चितच लांबणीवर पडणार आहे. मी सिनेमाच्या स्क्रिप्टचा फायनल ड्राफ्ट तयार केला आहे. शाहिद, कृती सेनन आणि नवाजुद्दीन सिद्दीकी यांना सिनेमाची पटकथा ऐकवली आहे. आम्ही जूनमध्ये शूटिंगला सुरुवात करणार होतो. खरं तर शाहिदच्या लग्नाची बातमी सरप्राइजप्रमाणे समोर आली. जून हा शूटिंगसाठी प्रमुख महिना होता. आता शाहिद याच महिन्यात लग्न करणार असल्याने, आम्हाला पुन्हा शूटिंग शेड्युल तयार करावे लागणार आहे."
मुंबई आणि हैदराबाद येथे शूटिंग होणार आहे आणि पावसाळ्यात शूटिंग करणे अवघड जाईल, असेही राज यांनी सांगितले.