एन्टरटेन्मेंट डेस्कः अभिनेता
अजय देवगण सध्या आपल्या आगामी शिवाय या सिनेमामुळे चर्चेत आहे. या सिनेमातील नवीन गाणे नुकतेच रिलीज करण्यात आले आहे. या गाण्यात अजय देवगण एरिका नावाच्या अभिनेत्रीसोबत रोमान्स करताना दिसतोय. विशेष म्हणजे या गाण्यात अजय आणि एरिकाचा किसींग सीन लक्ष वेधून घेतोय. रंजक बाब म्हणजे 25 वर्षांच्या फिल्मी करिअरमध्ये अजय पहिल्यांदा ऑनस्क्रिन अभिनेत्रीला किस करताना दिसतोय, असे म्हटले जात आहे. मात्र अमिताभ बच्चन यांनी ट्विट करुन हे खोटे असल्याचे सांगितले आहे. 'सत्याग्रह' या सिनेमात अजयने ऑन स्क्रिन किसींग सीन दिल्याचे अमिताभ यांनी ट्विट करुन सांगितले आहे.
असो, काहीही असले तरी अजय देवगण आणि एरिकाचा या नवीन गाण्यातील खास अंदाज लक्ष वेधून घेत आहे. शिवाय या सिनेमातील बोलो हर हर नंतर आता यातील दरखास्त या गाण्याचा 36 सेकंदांचा टीजर रिलीज करण्यात आला आहे. 22 सप्टेंबर रोजी संपूर्ण गाणे प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हे एक रोमँटिक गाणे आहे. यामध्ये अरजित सिंह आणि सुनिधी चौहान यांनी हे गाणे स्वरबद्ध केले आहे. बुल्गारियामध्ये हे गाणे शूट झाले आहे. अजयचा हा एक महत्त्वकांक्षी सिनेमा आहे. या सिनेमात त्याने केवळ अभिनयच केला नाहीये, तर स्वतः सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे.
या सिनेमात अजयसोबत झळकरणारी एरिका ही पोलंडची असून The Passing Bells या बीबीसी टीव्ही सीरिजमधून प्रसिद्ध झाली आहे. दीवाळीच्या मुहूर्तावर म्हणजे 28 ऑक्टोबर रोजी हा सिनेमा रिलीज होणारेय.
पुढील स्लाईड्समध्ये बघा, 'शिवाय' या सिनेमातील नवीन गाण्याची आणि पोस्टरची खास झलक...